नाशिकः नाशिककरांसाठी (Nashik) एक आनंदवार्ता. अमेरिकेत (American Cricket) पहिल्यांदाच होणाऱ्या अमेरिकन क्रिकेट प्रीमिअर लीगमध्ये (Premier League) नाशिकचा तरुण नीरज शेखर परांजपेची (Neeraj Paranjape) निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याचे कौतुक होत आहे. नीरजची अमेरिकन क्रिकेट प्रीमिअर लीगमधल्या बेंगालीज संघात निवड झाली आहे. येत्या 20 ते 30 सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा होणार आहे. (Neeraj Paranjape of Nashik selected in American Cricket Premier League)
अमेरिकेतला सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून बेसबॉलची ओळख. तसे जगभराला फुटबॉलचे वेड. त्यानंतर क्रिकेट आणि टेनीस म्हणता येईल. मात्र, क्रिकेटची चटक एकदा लागली की, त्याची नशा उतरणे अवघडे असते. अकरा-अकरा खेळाडू. त्यांच्यात तडाखेबंद फलंदाजी आणि गोलंदाजी करणे. याची मजा काही औरच. ही सर इतर खेळात येणे शक्यच नाही. त्यामुळेच बेसबॉलला पसंदी देणाऱ्या अमेरिकेत आता क्रिकेटचे सामने रंगत आहेत. खरे तर सचिन तेंडूलकरने अमेरिकत पहिल्यांदा क्रिकेट रुजवण्याचा प्रयत्न केला. त्याने तिथे मास्टर्स क्रिकेट लीगचे आयोजन केले होते. त्याचे फळ म्हणजे आता सप्टेंबर महिन्यात 20 ते 30 तारखेदरम्यान होणाऱ्या अमेरिकन प्रीमिअर लीग 2021 चे आयोजन म्हणावे लागेल. याच प्रीमिअर लीगमध्ये नाशिकच्या नीरजची निवड झाली आहे.
कोण आहे नीरज?
नीरज हा तुमच्या-आमच्यासारखा गल्ली क्रिकेट खेळलेला तरुण आहे. नाशिकच्या रचना हायस्कूलमध्ये त्याचे शिक्षण झाले. प्राथमिक शाळेसह हायस्कूलच्या मैदानावर त्याने आपले क्रिकेट प्रेम जपले. त्यानंतर त्याने पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीची पदवी चांगल्या गुणांनी मिळवली. या काळातही त्याने आपले क्रिकेट प्रेम जपले. विशेष म्हणजे क्रिकेट खेळणे सुरू ठेवले. नीरज 2017 मध्ये नोकरीसाठी अमेरिकेत गेला. तिथली नोकरी फाइव्ह डे कल्चरची. त्यासाठी त्याला रोज बारा-बारा तास काम करावे लागायचे. येथेही त्याने क्रिकेट सोडले नाही. त्यामुळेच त्याची अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या प्रीमिअर लीगच्या संघामध्ये निवड झाली आहे.
अमेरिकेतही स्थानिक क्रिकेट गाजवले
नीरजने अमेरिकेतही स्थानिक क्रिकेट स्पर्धा गाजवल्या आहेत. न्यू जर्सी येथे 20 ओव्हरच्या अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये तो खेळला आहे. विशेष म्हणजे तो ऑलराउंडर आहे. तडाखेबंद बॅटींगसोबत गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या साऱ्या क्षेत्रामध्ये त्याची निपुणता आहे. या संघात त्याची ऑलराउंडर म्हणूनच निवड झाल्याने त्याची मित्रमंडळी, नातेवाईक आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Neeraj Paranjape of Nashik selected in American Cricket Premier League)
इतर बातम्याः
नाशिकमध्ये मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू; तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार
महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे सक्रिय; 21 सप्टेंबर पासून नाशिक दौऱ्यावर
‘नासाका’चे बॉयलर पेटणार, खासदार पुत्र गोडसेंकडे सारथ्य जायची शक्यता