6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6, 12 SIX, नेपाळच्या बॅट्समनच वेगवान शतक, मोडला रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड

| Updated on: Sep 27, 2023 | 11:09 AM

T20 मध्ये नवीन वर्ल्ड रेकॉर्ड करणारा नेपाळचा हा फलंदाज कोण आहे?. दीपेंद्रने तुफानी बॅटिंग केली. त्याने 9 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यात आठ सिक्स होते. तो 15 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय. पण एकाही सामन्यात शतक झळकावल नव्हतं.

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6, 12 SIX, नेपाळच्या बॅट्समनच वेगवान शतक, मोडला रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड
Kushal Malla T20 World Record
Image Credit source: AFP
Follow us on

नवी दिल्ली : चीनमध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये नेपाळच्या क्रिकेट टीमने रेकॉर्डचा पाऊस पाडलाय. नेपाळच्या टीमने बुधवारी मंगोलिया विरुद्ध पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 314 धावांचा डोंगर उभारला. टी 20 मधील हा सर्वात मोठा स्कोर आहे. नेपाळचा फलंदाज कुशल मल्लाने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. कुशल मल्लाने टी20 मध्ये वेगवान शतक झळकावलं. मंगोलिया विरुद्ध त्याने 34 चेंडूत शतक झळकावलं. रोहितने 2017 साली इंदोरमध्ये श्रीलंकेविरुद्ध 34 चेंडूत शतक झळकावलं होतं. कुशल मल्ला 50 चेंडूत 12 सिक्स आणि 8 फोरसह नाबाद 137 धावा केल्या. त्याने 274 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान शतक झळकावण्याचा रेकॉर्ड रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेविड मिलरच्या नावावर होता. मिलरने 2017 साली बांग्लादेश विरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावल होतं. रोहितने त्याच्यानंतर दोन महिन्यांनी 22 डिसेंबरला टी 20 मध्ये शतकाचा रेकॉर्ड केला.

कुशल मल्लाच T20 मधील हे पहिलं शतक आहे. याआधी तो 15 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय. पण एकाही सामन्यात शतक झळकावल नव्हतं. त्याच्या नावावर फक्त एक अर्धशतक होतं. 19 वर्षाच्या कुशल मल्लाने मंगोलिया विरुद्ध शानदार बॅटिंग केली. टीमने पाचव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर आसिप शेखचा विकेट गमावला. त्यानंतर कुशल मल्लाने क्रीजवर पाऊल ठेवलं. त्याने दे दणादण बॅटिंग सुरु केली. मंगोलियाच्या गोलंदाजांची वाट लावून टाकली. तो थांबला नाही. धडाधड धावा सुरु ठेवल्या.

9 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवणारा फलंदाज कोण?

कुशल मल्ला एकाबाजूने वेगाने धावा बनवत होता. दुसऱ्याबाजूला दीपेंद्र सिंह सुद्धा फॉर्ममध्ये होता. नेपाळने आठव्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मुख्य फलंदाज कुशल भुर्तेलचा विकेट गमावला. त्याने 23 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 19 धावा केल्या. कॅप्टन रोहित पॉडेल 19 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आऊट झाला. त्याने 27 चेंडूत दोन फोर आणि सहा सिक्सच्या मदतीने 61 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या दीपेंद्रने तुफानी बॅटिंग केली. त्याने 9 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. 20 इंटरनॅशनलमधील हे वेगवान अर्धशतक आहे. दीपेंद्रने 10 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. त्याने 8 सिक्स मारेल.