500 पेक्षा जास्त विकेट त्याच्या नावावर, मात्र असं असूनही ‘या’ दिग्गज गोलंदाजाने 12 चेंडूत दिल्या 60 धावा

| Updated on: Aug 20, 2024 | 9:58 AM

T20 क्रिकेटमध्ये तो उत्तम गोलंदाज मानला जातो. त्याच्या गोलंदाजीमध्ये पेस, बाऊन्स आणि स्विंग सगळं आहे. गोलंदाजीच उत्तम कौशल्य असूनही त्याच्या नावावर एका नको त्या रेकॉर्डची नोंद झालीय. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने 2 ओव्हर्समध्ये 60 धावा दिल्या.

500 पेक्षा जास्त विकेट त्याच्या नावावर, मात्र असं असूनही या दिग्गज  गोलंदाजाने 12 चेंडूत दिल्या  60 धावा
Cricket
Image Credit source: Surjeet Yadav/Getty Images
Follow us on

ज्या गोलंदाजाकडे पेस, बाऊन्स आणि स्विंग आहे, त्या बॉलरविरोधात धावा बनवणं जराही सोपं नसतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका दिग्गज गोलंदाजाकडे हे सर्व कौशल्य असूनही त्याला चांगलाच मार बसला. हा गोलंदाज आहे नेदरलँड्सचा लोगन वॅन बीक. सध्या हा गोलंदाज केमॅन आइलँड्सवर सुरु असलेल्या MAX60 League मध्ये खेळतोय. लोगन वॅन बीकने ग्रँड केमॅन जॅगुआर्सकडून खेळताना 2 ओव्हरमध्ये 60 धावा दिल्या.

वॅन बीकच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांनी खोऱ्याने धावा वसूल केल्या. त्याच्या एका ओव्हरमध्ये 37 रन्स लुटल्या. त्यावरुन वॅन बीकची गोलंदाजी कशी फोडून काढली त्याची कल्पना येते. वॅन बीकने कॅरेबियन टायगर्स विरुद्ध शेवटची ओव्हर टाकली. त्याच्या या ओव्हरमध्ये 3 सिक्ससह 37 धावा चोपल्या. वॅन बीकच्या या ओव्हरमध्ये पहिल्या तीन चेंडूंवर एक सिक्स आणि दोन चौकार बसले. चौथ्या चेंडूवर एक धाव दिली. त्यानंतर बीकने एक वाइड आणि दोन नो बॉल टाकले. यात एक चौकार आणि एक षटकार मारला.

टीमचा मुख्य खेळाडू

लोगन वॅन बीक नेदरलँड्स टीमचा मुख्य खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने 33 वनडेमध्ये 46 आणि 31 टी20 सामन्यात 36 विकेट काढल्या आहेत. टी20 मध्ये त्याचा प्रति ओव्हर इकॉनमी रेट 7.50 रन आहे. वॅन बीकच्या प्रोफेशनल करियरबद्दल बोलायच झाल्यास त्याने 554 विकेट काढल्या आहेत. वॅन बीकने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 206, लिस्ट ए मध्ये 181 आणि टी20 मध्ये 167 विकेट काढल्या आहेत. इतका अनुभव असूनही त्याने MAX60 League मध्ये 2 ओव्हरमध्ये 60 धावा दिल्या.

कोण जिंकलं?

या मॅचमध्ये कॅरेबियन टायगर्सनी ग्रँड केमॅन जॅगुआर्सवर 65 धावांनी विजय मिळवला. कॅरेबियन टायगर्सनी पहिली बॅटिंग केली. त्यांनी 10 ओव्हरमध्ये 153 रन्स केल्या. प्रत्युत्तरात ग्रँड केमॅनची टीम 88 धावाच करु शकली.