मुंबई: T20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला जसप्रीत बुमराहच्या रुपाने मोठा झटका बसला. टीम इंडियाप्रमाणेच अन्य देशाच्या टीम्सनाही दुखापतीचा मोठा फटका बसला आहे. न्यूझीलंडचही टी 20 वर्ल्ड कपआधी मोठं नुकसान झालय. न्यूझीलंडचा ऑलराऊंडर डॅरिल मिचेलला दुखापत झालीय.
डॅरिल मिचेलला शुक्रवारी प्रॅक्टिस सेशन दरम्यान दुखापत झाली. त्याच्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झालं आहे. एक्स-रे मधून हे समोर आलय. त्याचं टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये खेळणं निश्चित नाहीय.
डॅरिल मिचेलला बरं होण्यासाठी 2 आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. टीमचे फिजियो थियो कपाकॉलकिस यांनी ही माहिती दिली. दुखापतीमुळे मिचेल पाकिस्तान-बांग्लादेश विरुद्ध सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतून बाहेर गेला आहे.
डॅरेल मिचेलच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबद्दल पुढे निर्णय घेतला जाईल. टीम 15 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. “मिचेल याला दुखापत होणं हे दु:खद आहे. तो टी 20 टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. ट्राय सीरीजमध्ये त्याची उणीव जाणवेल” असं स्टीड यांनी म्हटलं आहे.
डॅरेल मिचेल मागच्यावर्षभरापासून कमालीचा फॉर्ममध्ये आहे. या खेळाडूने टेस्ट आणि टी 20 दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपला धाक निर्माण केलाय. टी 20 क्रिकेटमध्ये मिचेलने 10 डावात 33 पेक्षा जास्त सरासरीने 265 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही 150 पेक्षा जास्त होता.