बर्मिंघम : संपूर्ण जग वाट पाहत असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची (World Test Championship Final) तयारी शिगेल पोहोचली आहे. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सामन्यासाठी पूर्णपणे तयार झाले आहेत. दरम्यान न्यूझीलंडने इंग्लंडला त्याच्यांच मैदानात 2 कसोटी सामन्याच्या सिरीजमध्ये 1-0 ने पराभूत करत विजय मिळवला आहे. या विजयासह न्यूझीलंडने भारताला जणू एक चेतावनीच दिली आहे. पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या टेस्टमध्ये 8 विकेट्सने इंग्लंडला नमवत विजय मिळवला. (New Zealand beat England by 8 wickets in Practice Test Match)
The @BLACKCAPS come out on top ✌️
New Zealand seal their first Test series victory in England since 1999, after an eight-wicket win in Edgbaston! #ENGvNZ | https://t.co/ukVyuJQZm0 pic.twitter.com/fEzTHYnAq3
— ICC (@ICC) June 13, 2021
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना सुरुवातीला चुरशीचा झाला. पहिल्या डावात इंग्लंडने 303 धावा केल्या, ज्याच्या उत्तरात न्यूझीलंडने 388 धावा करत 85 धावांची लीड घेतली. ज्यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडने इंग्लंडला अवघ्या 122 धावांवर ऑलआऊट केले. ज्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी केवळ 38 धावांची गरज होती. जी न्यूझीलंडने 10.5 ओव्हरमध्ये दोन विकेटच्या बदल्य़ात पूर्ण करत सामना आपल्या नावे केला.
इंग्लंडचा दुसरा डाव 122 धावांवर आटोपल्यामुळेच न्यूझीलंडला विजय मिळवणे सोपे झाले. दरम्यान न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात मॅट हेन्री आणि नील वेगनर यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतले ज्यामुळे इंग्लंडचा डाव लवकर आटोपला. त्याचसोबत ट्रेंट बोल्ट आणि एजाज पटेल यांनी दोन-दोन विकेट पटकावले.
भारतीय संघाने आपला विलगीकरण कालावधी पूर्ण केला असून सध्या मैदानावर जोरदार सराव करत आहे. त्यात न्यूझीलंडने देखील दोन कसोटी मालिकांच्या सिरीजमध्ये इंग्लंडला 1-0 ने नमवत आपली तयारी दर्शवली आहे. त्यामुळे दोन्ही संघ आता थेट 18 जून रोजी साउदम्पटनच्या मैदानात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी उतरणार आहेत. हा सामना म्हणजे कसोटी क्रिकेटचा विश्वचषकाचा अंतिम सामन्याप्रमाणे असल्याने सर्व क्रिकेटप्रेमी यासाठी कमालीचे उत्सुक आहेत.
या विजयासह न्यूझीलंड आयसीसीच्या कसोटी संघाच्या (ICC Test Ranking) क्रमवारीत भारताला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ क्रमवारीत 120 पॉइंट्सह दुसऱ्या स्थानावर होता तर भारत पहिल्या स्थानी विराजमान होता. मात्र दोन्ही संघात केवळ एका गुणाचा फरक होता. या विजयासह न्यूझीलंडचे 123 पॉईंट्स झाले आहेत. ज्यामुळे ते पहिल्या स्थानी पोहोचले असून भारत दुसऱ्या स्थानी घसरला आहे.
हे ही वाचा :
या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!
WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी
(New Zealand beat England by 8 wickets in Practice Test Match)