NZ vs ENG Test : न्यूझीलंडच्या टीमने वेलिंग्टन टेस्टमध्ये रोमांचक विजय मिळवला आहे. त्यांनी इंग्लंडला अवघ्या 1 रन्सने हरवलं. दोन देशांमधील 2 टेस्ट मॅचची सीरीज 1-1 अशी बरोबरीत सुटली. टिम साऊदीच्या नेतृत्वाखाली मिळालेला न्यूझीलंडचा हा एकमेव विजय आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली 13 कसोटीतील इंग्लंडला हा तिसरा पराभव आहे. न्यूझीलंडने वेलिंग्टन कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंड़समोर 258 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. पण इंग्लंडची टीम फक्त 256 धावाच करु शकली. संपूर्ण सामन्यात इंग्लंडची बाजू वरचढ होती. पण क्रिकेटमध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत काही सांगता येत नाही. कधीही सामना पलटू शकतो. वेलिंग्टन कसोटीतही हाच रोमांचक अंदाज पहायला मिळाला.
फॉलोऑनचा डाव उलटला
वेलिंग्टन टेस्टमध्ये न्यूझीलंडला फॉलोऑन दिल्यानंतर इंग्लंडची टीम हरली. पहिल्या डावात इंग्लंडला 226 धावांची आघाडी मिळाली होती. इंग्लंडने पहिल्या डावात 8 विकेटवर 435 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव 209 धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला. पण हा डाव उलटा पडला.
80 धावात 5 विकेट
न्यूझीलंडने फॉलोऑनमध्ये खेळताना दुसऱ्या डावात 483 धावा केल्या. त्यांनी इंग्लंडचा 226 धावांचा लीड फेडला व विजयासाठी इंग्लंड टीमसमोर 258 धावांच टार्गेट ठेवलं. यात 132 धावांची इनिंग खेळणारा केन विलियमसनची भूमिका महत्त्वाची होती. इंग्लंडची टीम या टार्गेटचा पाठलाग करताना त्यांची सुरुवात अडखळली. फक्त 80 धावात त्यांचे 5 विकेट गेले होते.
WHAT A GAME OF CRICKET
New Zealand have won it by the barest of margins…
This is test cricket at its finest ❤️
#NZvENG pic.twitter.com/cFgtFBIkR4
— Cricket on BT Sport (@btsportcricket) February 28, 2023
इंग्लंडने सामन्यात पुनरागमन केलं
जो रुट एकाबाजूने टिकून फलंदाजी करत होता. दुसऱ्याबाजूने त्याला बेन स्टोक्सची साथ मिळाली. इंग्लंडने पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन केलं. जो रुट 95 धावा करुन आऊट झाला. बेन स्टोक्सने 33 धावा केल्या. त्यानंतर फोक्सने 35 धावा केल्या. या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे इंग्लंडने डाव शेवटापर्यंत नेला. पण इंग्लंडचे प्रयत्न अपुरे पडले. अवघ्या 1 रन्सने त्यांचा पराभव झाला.
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला?
इंग्लंडला 258 धावांच विजयी लक्ष्य गाठण्यापासून रोखण्यात न्यूझीलंडचा कॅप्टन टिम साऊदीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने दुसऱ्या डावात महत्त्वाचे 3 विकेट काढले. साऊदीशिवाय नील वॅगनरने दुसऱ्याडावात 4 विकेट काढले. न्यूझीलंडकडून शतक झळकवणारा केन विलियमसनचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला.