NZ vs ENG : 146 वर्षात असा विजय मिळवणारी न्यूझीलंड दुसरी टीम, टेस्ट क्रिकेटमध्ये क्वचित असं घडतं

| Updated on: Feb 28, 2023 | 12:10 PM

NZ vs ENG : टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत फक्त 4 वेळा असं झालय. न्यूझीलंडने जो विजय मिळवला, तसा विजय मिळवणारी न्यूझीलंड दुसरी टीम आहे.

NZ vs ENG : 146 वर्षात असा विजय मिळवणारी न्यूझीलंड दुसरी टीम, टेस्ट क्रिकेटमध्ये क्वचित असं घडतं
eng vs nz
Follow us on

NZ vs ENG Test : न्यूझीलंडने इंग्लंडला वेलिंग्टन टेस्ट मॅचमध्ये हरवलं. इंग्लंडने फॉलोऑन देऊनही न्यूझीलंडची टीम विजयी ठरली. म्हणजे इंग्लंडची टीम आपणच रचलेल्या जाळ्यात फसली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत फक्त 4 वेळा असं झालय. न्यूझीलंडने जो विजय मिळवला, तसा विजय मिळवणारी न्यूझीलंड दुसरी टीम आहे. न्यूझीलंडने इंग्लंडला वेलिंग्टन टेस्टमध्ये 1 रन्सने हरवलं. टेस्ट क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या विजयाची स्क्रिप्ट लिहीणारी न्यूझीलंड दुसरी टीम आहे.

30 वर्षांपूर्वी टेस्ट क्रिकेटमध्ये अशा प्रकारची स्क्रिप्ट पहिल्यांदा वेस्ट इंडिजने लिहिली होती. त्यांनी 1993 साली 1 रन्सने विजय मिळवला होता. वेस्ट इंडिजच्या टीमने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता.

चौथ्यांदा असं घडलं

इंग्लंडची टीम न्यूझीलंडला फॉलोऑन दिल्यानंतर हरली. टेस्ट क्रिकेटच्या 146 वर्षांच्या इतिहासात चौथ्यांदा असं घडलय. जेव्हा कुठल्या टीमने फॉलोऑन दिला व त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
ऑस्ट्रेलिया फॉलोऑन देऊन कुठल्या टीमकडून हरली?

टेस्ट क्रिकेटमध्ये आतापर्यतं फॉलोऑन देऊन ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचीच टीम हरली आहे. ऑस्ट्रेलियासोबत आतापर्यंत असं तीन वेळा तर इंग्लंड बरोबर पहिल्यांदा असं घडलय. ऑस्ट्रेलियाला सर्वप्रथम फॉलोऑन दिल्यानंतर 1894 मध्ये इंग्लंडकडून, 1981 मध्ये पुन्हा इंग्लंडकडून, 2001 साली भारताकडून पराभूत व्हाव लागलं. इंग्लंडला आता फॉलोऑन दिल्यानंतर न्यूझीलंडने हरवलय.