मुंबई : आगामी आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2021) न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट संघाने आपला संघ जाहीर केला आहे. केन विलियमसन (Kane Williamson) च्या नेतृत्त्वाखाली 16 सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन 17 ऑक्टोबरपासून होणार आहे. मात्र न्यूझीलंड संघाने दोन महिन्यांपूर्वीच संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे संघातील सर्वात दिग्गज खेळाडू रॉस टेलरला यंदा विश्रांती देण्यात आली असून त्याचा समावेश केला गेलेला नाही. तसेच कोलिन डी ग्रँडहोम, टॉम लॅथम सारखी तगडी नावही दिसून येत नाहीत.
संघाने मिचेल सँटनर, ईश सोढ़ी आणि टॉड एस्टल या तीन फिरकीपटूंना संघात स्थान दिलं आहे. तर वेगवान गोलंदाजीची धुरा ट्रेंट बोल्ट, काइल जेमिसन, लॉकी फर्ग्यूसन आणि टिम साउदी यांच्यावर असेल. याशिवाय जिम्मी नीशम आणि मार्क चेपमॅन अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना दिसतील. टिम सीफर्ट यष्टीरक्षक असेल. हाच संघ भारताच्या दौऱ्यावर देखील असेल ज्यावेळी तीन टी-20 सामन्यांसह दोन टेस्ट सामने खेळवले जातील. यासोबतच न्यूझीलंडने पाकिस्तान आणि बांग्लादेश दौऱ्यासाठीचा संघ देखील जाहीर केला आहे. हा संघ 23 ऑगस्ट रोजी बांग्लादेश दौऱ्यासाठी रवाना होईल.
Squads galore from @BLACKCAPS ?? #T20WorldCup #BANvNZ #PAKvNZ #INDvNZhttps://t.co/BhaGS9v0Tu
— ICC (@ICC) August 10, 2021
केन विलियमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डेवन कॉन्वे, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, टिम सीफर्ट (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, ईश सोढ़ी, ग्लेन फिलिप्स, जिम्मी नीशम, डेरिल मिचेल, काइल जेमिसन, लॉकी फर्ग्यूसन, मार्क चेपमॅन आणि टॉड एस्टल.
टॉम लॅथम (कर्णधार), फिन एलन, हामिश बेनेट, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डग ब्रेसवेल, कोलिन डी ग्रँडहोम, जॅकब डफी, मॅट हेन्री (वनडे), स्कॉट कुगलइन, कोल मॅक्कॉन्ची, एजाज पटेल, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र बेन सियर्स, ब्लेयर टिकनर आणि विल यंग.
हे ही वाचा –
IPL 2021 साठी नियमांमध्ये बदल, बीसीसीआयकडून नवी नियमावली जाहीर
(New zealand cricket team announces squad for T20 world cup 2021 ross taylor is out of team)