मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे इंडियन प्रिमियर लीग (IPL 2021) अचानक स्थगित करण्यात आली होती. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वीच उर्वरीत आयपीएलचे सामने युएईत (UAE) घेणार असल्याची माहिती दिली. सप्टेंबरमध्ये सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये अनेक परदेशी खेळाडूंच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उठवले जात आहेत. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा (KKR) कर्णधार इंग्लंडचा इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) असल्याने तो आयपीएलसाठी न आल्यास केकेआरला नवा कर्णधार निवडावा लागेल. दरम्यान माजी कर्णधार दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) कर्णधारपद सोपवण्याची चर्चा असतानाच केकेआरचा प्रशिक्षक ब्रँडन मॅक्क्युलमने (Brendon Mccullum) दिनेश नाहीतर युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) कर्णधार होऊ शकतो असा दावा केला आहे. (New Zealand Former Cricketer Brendon Mccullum says Shubman Gill will soon lead an IPL side and maybe Team India too)
केकेआरचा प्रशिक्षक मॅक्क्युलमने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत युवा खेळाडू शुभमन एक उत्कृष्ट क्रिकेटपटू असून त्याला खेळाचे ज्ञान आहे. त्यामुळे तो आयपीएलमधील संघासह भविष्यात भारतीय संघाचे देखील नेतृत्त्व करु शकतो. असा दावा केला आहे. सोबतच त्याने शुभमनला आणखी खूप शिकायचे असून मूळात त्याच्यात टॅलेंट असल्याने तो सर्वकाही शिकेल अशा विश्वासही वर्तवला आहे.
ब्रँडन मुलाखतीत शुभमनबद्दल बोलताना म्हणाला की,”शुभमन युवा क्रिकेटपटूसह एक उत्तम व्यक्ती देखील आहे. त्याला क्रिकेटबद्दल बरीच माहिती असून सोबतच्या खेळाडूंबद्दलही त्याला माहिती आणि आपुलकी आहे. त्यामुळे त्याने चांगला खेळ दाखवला तर तो नक्कीच एक चांगला कर्णधार बनू शकतो. एका आयपीएल संघासोबतच भविष्यात भारतीय संघाचे नेतृत्त्वही शुभमन करु शकतो.”
ब्रँडन शुभमनच्या यंदाच्या आयपीएलमधील खेळाबद्दल सांगताना म्हणाला. ”शुभमनने यंदा 7 सामन्यांत केवळ 132 रन्सच केले, त्याच्यासारख्य़ा खेळाडूकडून संघाला जास्त अपेक्षा आहेत. त्यामुळे आम्ही सर्वच त्याच्या खेळावर लक्ष देत असून लवकरच त्याला एक अव्वल दर्जाचा टी-20 क्रिकेटपटू बनवणार आहोत. तसंच उर्वरीत आयपीएलमध्ये शुभमनसह केकेआरचा संघ कशी कामगिरी करेल याबद्दलही आम्ही उत्सुक आहोत.”
संबधित बातम्या :
T20 World Cup : टी 20 वर्ल्डकप भारतात होणार की नाही, BCCI च्या बैठकीत काय ठरलं?
IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय
आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची तारीख ठरली, पण BCCI पुढे ही सर्वांत मोठी अडचण!
(New Zealand Former Cricketer Brendon Mccullum says Shubman Gill will soon lead an IPL side and maybe Team India too)