ऑकलंड : वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जवळ आली आहे. वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंटला फक्त 4 महिने उरले आहेत. क्रिकेट विश्वातील सर्वच टीम्सनी वनडे वर्ल्ड कपची तयारी आतापासून सुरु केलीय. कुठले प्लेयर टीममध्ये निवडायचे? प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण असणार? दुखापतीमुळे कोणी खेळणार नसेल, तर पर्याय काय? याचा विचार आतापासून सुरु केलाय. वनडे वर्ल्ड कपआधी सर्वच टीम्ससाठी खेळाडूची दुखापत हा मोठा विषय असणार आहे. IPL 2023 आधी आपण पाहिलं, दुखापतीमुळे अनेक चांगले, चांगले प्लेयर्स आयपीएलमध्ये खेळू शकले नाहीत.
वनडे वर्ल्ड कपआधी क्रिकेट खेळणाऱ्या अव्वल टीम्सच्या महत्वाच्या सीरीज आहेत. अशावेळी आपल्या टीमच्या प्लेयर्सना दुखापतीपासून वाचवण्यासाठी सर्वच बोर्डाना वर्कलोड मॅनेजमेंट कराव लागणार आहे.
किती दिवस चालणार वर्ल्ड कप स्पर्धा?
वनडे वर्ल्ड कप स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. ICC टुर्नामेंट ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धा चालणार आहे. संपूर्ण 45 दिवस वर्ल्ड कपचा कार्यक्रम आहे. ओपनिंग आणि फायनल मॅचमध्ये अहमदाबादमध्ये प्रस्तावित आहे.
तो वनडे वर्ल्ड कपमधून OUT
वनडे वर्ल्ड कप आधी क्रिकेट विश्वातील मोठी टीम न्यूझीलंडला धक्का बसला आहे. न्यूझीलंड टीमचा स्टार ऑलराऊंडर मायकल ब्रेसवेल वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याची माहिती आहे. ब्रेसवेलला झालेली दुखापत हे त्यामागे कारण आहे. ब्रेसवेलवर सर्जरी होणार आहे. त्यातून सावरण्यासाठी ब्रेसवेलला वेळ लागले. त्यामुळेच मायकल ब्रेसवेल वनडे वर्ल्ड कपमधून आऊट झालाय.
कुठे होणार ऑपरेशन?
मायकल ब्रेसवेलच्या दुखापतीवर ब्रिटनमध्ये ऑपरेशन होणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघटनेकडून ही माहिती देण्यात आलीय. या सर्जरीतून सावरण्यासाठी त्याला 6 ते 8 महिन्यांचा वेळ लागेल. इंग्लंडच्या T20 ब्लास्ट टुर्नामेंटमध्ये वोर्सेस्टरशायर रॅपिड्सकडून खेळताना मायकल ब्रेसवेलला ही दुखापत झाली.
Michael Bracewell can’t Do anything Wrong
Hat-trick in his First Over of T20 Internationals is just amazing and Unbelievable ?pic.twitter.com/nIPmvgCmjM— ⚡ (@Visharad_KW22) July 20, 2022
हेड कोच काय म्हणाले?
दुखापत ही खेळ आणि खेळाडूशी संबंधित आहे असं न्यूझीलंडचे हेड कोच गॅरी स्टीड म्हणाले. मायकल ब्रेसवेलला आपल्या दुखापतीच दु:ख आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळता येणार नाही, म्हणून तो जास्त निराश आहे. ऑपरेशननंतर तो रिहॅबवर फोकस करेल.