Jasprit Bumrah injury : जसप्रीत बुमराहवर ऑपरेशन होणार आहे. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया होणार आहे. जसप्रीत बुमराह न्यूझीलंडला जाणार असल्याच वृत्त आहे. क्रिकबजच्या वृत्तानुसार, न्यूझीलंडचे प्रसिद्ध सर्जन Rowan Schouten बुमराहवर ऑपरेशन करणार आहेत. जसप्रीत बुमराहसाठी या डॉक्टरच नाव मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच आणि न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड यांनी सुचवलं आहे. शेन बॉन्ड आणि जसप्रीत बुमराह यांच्यामध्ये गुरु-चेल्याच नातं आहे. बुमराहने अनेकदा ही गोष्ट मान्य सुद्धा केलीय.
कोण आहेत Rowan Schouten ?
Rowan Schouten कधी काळी ग्राहम इंग्लिससोबत मिळून काम करायचे. इंग्लिस न्यूझीलंडचे सीनियर मोस्ट सर्जन आहेत. याच इंग्लिस यांनी कधीकाळी बुमराहचे गुरु शेन बॉन्ड यांच्यावर शस्त्रक्रिया करुन त्याचं करिअर वाचवलं होतं. आता याच इंग्लिस यांचे असिस्टेंट Rowan Schouten बुमराहवर शस्त्रक्रिया करणार आहेत.
अजून किती क्रिकेटपटूंवर ऑपरेशन केलय?
Rowan Schouten हे न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च शहरातील बेस्ट सर्जन आहेत. त्यांनी याआधी इंग्लंडचा पेस बॉलर जोफ्रा आर्चरची सुद्धा बॅक शस्त्रक्रिया केली आहे. आर्चरशिवाय Rowan Schouten यांनी Ben Dwarshuis आणि जेसन बेहरनडॉर्फ यांचं सुद्ध ऑपरेशन केलय. त्याशिवाय ग्राहम इंग्लिस यांच्यासोबत काही अन्य खेळाडूंच्या शस्त्रक्रिया सुद्धा केल्या आहेत.
Rowan Schouten यांनी, शेन बॉन्डशिवाय मॅट हेनरी, नाथन एलिस, हमिश बेनेट, जेम्स पॅटिसन आणि कोरी अँडरसन यांच्या शस्त्रक्रियांमध्ये ग्राहम इंग्लिस यांना सहकार्य केलय.