World Cup 2023 मधून केन विल्यमसन आऊट? टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय!

| Updated on: Aug 29, 2023 | 2:45 PM

ODI World Cup 2023, Kane Williamson : न्यूझीलंड संघाचा स्टार खेळाडू मोठ्या संकटात सापडला आहे. संघाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या केन विल्यमसन याच्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

World Cup 2023 मधून केन विल्यमसन आऊट? टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय!
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कप 2023 च्या थराराला अवघे काही महिने बाकी आहेत. सर्व सघांंनी जोरदार तयारीला लागले आहेत. टीम मॅनेजमेंट संघात अनेक बदल करत नवनवीन प्रयोग करत आहे. (World Cup 2023) ऑक्टोबर महिन्यात या महासंग्रामाला सुरूवात होणार आहे. (ICC ODI World Cup 2023, Kane Williamson) लवकरच वर्ल्ड कपसाठीच्या संघांची घोषणा केली जावू शकते. अशातच वर्ल्डकपचा उपविजेता ठरलेल्या न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात केनच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूरच आहे मात्र आता अडचण अशी झाली आहे की केनच्या दुखापतीमुळे तो वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही याबाबत संभ्रम आहे. टीम मॅनेजमेंटने केनसमोर शेवटची अट ठेवत त्याला वेळ दिला आहे.

केन विल्यमसन याला दोन आठवड्याचा वेळ दिला आहे. न्यूझीलंडच्या टीम मॅनेजमेंटने त्याला दोन आठवड्यामध्ये फिट असल्याचं सिद्ध करून दाखवायला सांगितलं आहे. तसं पाहायला गेलं तर त्याचे खेळण्याचे संकेत कमीच आहे. महत्त्वाचं म्हणजे आयसीसीने संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर दिलीये.

सर्व संघाना 5 सप्टेंबरला आपला संघ जाहीर करायचा आहे. त्यानंतर 28 सप्टेंबरपर्यंत सर्व संघ आपापल्या संघात बदल करू शकतात. त्यामुळे केनसाठी आता दोन आठवडे कसोटीचे असणार आहेत. जर केन त्यामध्ये यशस्वी झाला नाहीतर त्याला या वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागू शकतं. केनच्या नेतृत्त्वाखाली 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड संघाने फायनलपर्यंत धडक मारलेली. मात्र इंग्लंडकडून त्यांच्या फायनल सामन्यामध्ये पराभव झाला होता. त्यानंतर पहिला कसोटी वर्ल्ड कपसुद्धा न्यूझीलंड संघाने केनच्या नेतृत्त्वाखालीच जिंकला होता.

दरम्यान, केन विल्यमसनच्या अनुपस्थितीचा संघाला मोठा फटका बसू शकतो. शांत डोक्याचा केनने आपल्या खेळाडूंना घेत आयीसीच्या स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याचं संघात असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की केन दोन आठवड्यांमध्ये फिट होतो की नाही.