PAK vs NZ T20 Semi Final: पाकिस्तानचा भेदक मारा, न्यूझीलंडने विजयासाठी मोठं लक्ष्य दिलं नाही

| Updated on: Nov 09, 2022 | 3:24 PM

PAK vs NZ T20 Semi Final: न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी मोठं लक्ष्य दिलेलं नाही.

PAK vs NZ T20 Semi Final: पाकिस्तानचा भेदक मारा, न्यूझीलंडने विजयासाठी मोठं लक्ष्य दिलं नाही
pakistan cricket
Image Credit source: AFP
Follow us on

सिडनी: T20 वर्ल्ड कप 2022 ची पहिली सेमीफायनल सिडनीमध्ये सुरु आहे. पहिली सेमीफायनल पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या टीममध्ये खेळली जातेय. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसनने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. अवघ्या 4 रन्सवर फिन फिन अॅलनच्या रुपाने न्यूझीलंडला पहिला झटका बसला. शाहीन शाह आफ्रिदीने त्याला पायचीत पकडलं.

न्यूझीलंडचे दोन मुख्य फलंदाज अपयशी 

त्यानंतर कॅप्टन केन विलियमसनने डेवॉन कॉनवेच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दुर्देवाने कॉनवे 21 धावांवर रनआऊट झाला. पावरप्लेमध्ये न्यूझीलंडला दोन झटके बसले. ग्लेन फिलिप्सही अपयशी ठरला. तो 6 रन्सवर अपयशी ठरला. विलियमसनने संयमी फलंदाजी केली. त्याने 42 चेंडूत 46 धावा केल्या. यात फक्त 1चौकार आणि 1 षटकार होता. शाहीन शाह आफ्रिदीने त्याला बोल्ड केलं.

पाकिस्तानला विजयासाठी किती धावांचे लक्ष्य?

डॅरेल मिचेलने फटकेबाजी केली. त्याने हाफ सेंच्युरी झळकवली. त्याच्या बॅटिंगमुळे न्यूझीलंडला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. मिचेलने 35 चेंडूत नाबाद 53 धावा फटकावल्या. न्यूझीलंडने न्यूझीलंडने 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 152 धावा केल्या. पाकिस्तानला विजयासाठी 153 धावांचे लक्ष्य दिले आहे.

न्यूझीलंडच्या टीमचा ग्रुप राऊंडमध्ये फक्त एक पराभव झालाय. त्यामुळे ते ग्रुप 1 मध्ये टॉपवर आहेत. पाकिस्तानच्या टीमची सुरुवातीला स्थिती खराब होती. दोन मॅच हरुनही पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचलीय.