NZ vs SL Test Match : केन विलियमसनच्या बॅटची जादू कायम आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये पुन्हा एकदा कमालीची बॅटिंग केली. त्याने श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळताना सलग तिसर शतक ठोकून रेकॉर्ड्सचा पाऊस पाडला. पहिली बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंड टीमची केन विलियमसनच्या शतकाच्या बळावर मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.
विलियमसनने 76 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर शतक झळकवलं. 171 चेंडूत त्याने 28 व शतक झळकवलं. ही कामगिरी करताना त्याने विराट कोहलीला मागे टाकलं.
विराटला किती इनिंग लागल्या?
विलियमसनच्या टेस्ट क्रिकेटमध्ये 8 हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. त्याची सरासरी 54 पेक्षा अधिक आहे. फॅब 4 मध्ये वेगवान 28 शतक ठोकणारा तो दुसरा फलंदाज बनलाय. त्याने विराट कोहलीला मागे टाकलं. विलियमसनने 164 इनिंगमध्ये 28 शतक ठोकली आहेत. तेच विराट कोहलीला टेस्टमध्ये 28 शतक झळकवण्यासाठी 183 इनिंग लागल्या.
822 बॉलमागे एक सिक्स
फॅब 4 मध्ये वेगवान 28 शतक झळकवण्याचा रेकॉर्ड स्टीव्ह स्मिथच्या नावावर आहे. त्याने 153 इनिंगमध्ये ही कमाल केलीय. विलियमसनने आपल्या शानदार इनिंग दरम्यान 2 चेंडूत सलग 2 सिक्स मारले. त्याने 15616 चेंडूंवर 19 सिक्स मारले. म्हणजे 822 बॉलमागे एक सिक्स. श्रीलंकेविरुद्ध या टेस्टमध्ये 2 चेंडूत त्याने 2 सिक्स मारेल.
विलियमसनच सलग तिसर शतक
विलियमसन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या शतकाच्या आधी मागच्या टेस्ट मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद 121 धावा फटकावल्या. याआधी इंग्लंड विरुद्ध त्याने 132 धावांची इनिंग खेळली होती. विलियमसन सलग 3 शतक ठोकणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज बनलाय.