मुंबई : मागील वर्षी कोरोनाच्या शिरकावामुळे स्थगित झालेली आयपीएल 2021 (IPL 2021) आता युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या आयोजना दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर (BCCI) परदेशी खेळाडूंचा आयपीएलमध्ये सहभाग ही सर्वात मोठी समस्या होती. ही समस्या आता हळूहळू नीट होत असून आधी इंग्लंड क्रिकेट बोर्डातील खेळाडूंना इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी दिली होती. त्यापाठोपाठ न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने देखील आपल्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी दिली आहे. यामुळे मुंबई इंडियनस, सनरायझर्स हैद्राबाद या संघाना विशेष फायदा होणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने याबाबतची माहिती मंगळवारी (10 ऑगस्ट) दिली. बोर्डाचे मुख्य कार्यकारी डेविड वाइट यांनी खेळाडूंना आयपीएल खेळू देण्याची परवानगी देतानाच ‘‘ही आमची व्यावसायिक वागणूक असून आयपीएलबाबत आम्ही कायमच सकारात्मक आणि आपुलकीने विचार केला आहे.’’
आगामी आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2021) न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट संघाने आपला संघ जाहीर केला आहे. केन विलियमसन (Kane Williamson) च्या नेतृत्त्वाखाली 16 सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन 17 ऑक्टोबरपासून होणार आहे. मात्र न्यूझीलंड संघाने दोन महिन्यांपूर्वीच संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे संघातील सर्वात दिग्गज खेळाडू रॉस टेलरला यंदा विश्रांती देण्यात आली असून त्याचा समावेश केला गेलेला नाही. तसेच कोलिन डी ग्रँडहोम, टॉम लॅथम सारखी तगडी नावही दिसून येत नाहीत.
केन विलियमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डेवन कॉन्वे, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, टिम सीफर्ट (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, ईश सोढ़ी, ग्लेन फिलिप्स, जिम्मी नीशम, डेरिल मिचेल, काइल जेमिसन, लॉकी फर्ग्यूसन, मार्क चेपमॅन आणि टॉड एस्टल.
हे ही वाचा –
IPL 2021 साठी नियमांमध्ये बदल, बीसीसीआयकडून नवी नियमावली जाहीर