लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे. आयपीएल 2024 मधील मुंबईचा हा शेवटचा सामना होता. ज्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुणतालिकेत संघ अगदी तळाला गेला आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला टीममध्ये घेऊन रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवले होते. पण त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले. रोहित शर्माला कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले. रोहित शर्माची या सीजनमधली आपली मध्यम स्वरुपाची राहिली. शेटवच्या सामन्यानंतर रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी बोलताना दिसले.
मुंबईचा माजी कर्णधार रोहित आणि नीता अंबानी यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या दोघांमध्ये काय चर्चा सुरु आहे ते कळू शकलेले नाही. पण काही चाहत्यांनी म्हटलेय की, रोहित मुंबई इंडियन्स सोडणार नाही. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
नुकताच रोहितचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये तो संघातील सध्याच्या परिस्थितीवर बोलत होता. या व्हिडिओवरून बराच गदारोळ झाला होता. रोहित आणि हार्दिक पांड्याचे संबंध देखील आता आधी सारखे राहिलेले नाही. इतर खेळाडूंना देखील हार्दिकच्या नेतृत्वात खेळण्याबाबत नाराजी असल्याचं दिसून आलं आहे.
हार्दिक पांड्या गेल्या मोसमात गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. गुजरात संघाने दमदार कामगिरी केली होती. मात्र तो मुंबईसाठी विशेष काही करू शकला नाही. पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने आयपीएल 2024 चे 14 सामने खेळले. या कालावधीत त्यांनी केवळ 4 सामने जिंकले आणि 10 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
तोडफोड from the get-go, a 𝐭𝐲𝐩𝐢𝐜𝐚𝐥 𝐑𝐨 𝐩𝐞𝐫𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐧𝐜𝐞 was on display in #MIvLSG 💪💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @ImRo45 pic.twitter.com/sddic4we6i
— Mumbai Indians (@mipaltan) May 18, 2024
रोहित शर्माने शेवटच्या सामन्यात 68 धावांची स्फोटक खेळी खेळली. सलामीच्या फलंदाजाला त्याच्या कामगिरीबद्दल विशेष पदक देण्यात आले. माजी कर्णधाराची उत्कृष्ट खेळी पाहून वानखेडे स्टेडियमवरील प्रेक्षक रोमांचित झाले. सामना संपल्यानंतर एमआयच्या ड्रेसिंग रूममध्ये मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांनी रोहितला विशेष पदक प्रदान केले.