IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या 2023 च्या सीजनची सुरुवात 31 मार्चपासून होणार आहे. क्रिकेट विश्वातील या मोठ्या लीगमध्ये सर्वोत्तम क्रिकेटर्स खेळताना दिसणार आहेत. आयपीएलमध्ये खेळणं प्रत्येक क्रिकेटरसाठी सन्मानाची बाब असते. पण प्रत्येकाला संधी मिळत नाही. वेस्ट इंडिजचा विकेटकीपर फलंदाज जॉन्सन चार्ल्स सोबत असच झालय. चार्ल्सला आयपीएल 2023 च्या ऑक्शनमध्ये कुठल्याही टीमने विकत घेतलं नाही.
पण आता या खेळाडूने आयपीएल सुरु होण्याआधी आपली क्षमता दाखवून दिलीय. जॉन्सन चार्ल्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीजमध्ये वेस्ट इंडिजला फक्त विजयच मिळवून दिला नाही, तर हा खेळाडू टॉप स्कोरर ठरला.
वेगवान टी 20 सेंच्युरी ठोकणारा पहिला फलंदाज
त्याला प्लेयर ऑफ द सीरीज अवॉर्ड मिळाला. या बॅट्समनने 3 मॅचमध्ये एकूण 14 सिक्स मारले. त्याच्या बॅटमधून 146 धावा निघाल्या. चार्ल्सचा स्ट्राइक रेट 239.34 चा आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात त्याने एक सेंच्युरी सुद्धा झळकवली. चार्ल्स सेंच्युरियनमध्ये 118 धावांची इनिंग खेळला. चार्ल्सने फक्त 39 चेंडूत शतक झळकावलं. वेस्ट इंडिजकजून वेगवान टी 20 सेंच्युरी ठोकणारा पहिला फलंदाज बनलाय.
तिसरा सामनाही रोमांचक
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील T20 सीरीज खूपच रोमांचक ठरली. तिसरा आणि शेवटचा सामनही रंगतदार झाला. जाहोन्सबर्गमध्ये झालेला तिसरा सामना वेस्ट इंडिजने 7 धावांनी जिंकला. वेस्ट इंडिजने तीन टी 20 सामन्यांची सीरीज 2-1 अशी जिंकली. तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने पुन्हा एकदा स्फोटक बॅटिंग केली. त्यांनी 220 धावा फटकावल्या. दक्षिण आफ्रिकेच्या टीमला 213 धावाच करता आल्या.