मुंबई: ऑस्ट्रेलिया विरुद्ध आजपासून तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. मोहालीमध्ये आज पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 काय असेल? याची उत्सुक्ता आहे. पहिल्या टी 20 आधी दिनेश कार्तिक आणि दीपक हुड्डा या दोघांच्या नावाची बरीच चर्चा आहे. आशिया कपमध्ये रोहित शर्माने दीपक हुड्डाला टीममध्ये संधी दिली. पण गोलंदाजी दिली नव्हती. त्याचवेळी दिनेश कार्तिकला फक्त एका मॅचमध्ये खेळवलं होतं.
असं पाऊल उचलण्याची शक्यता कमी
रोहितने दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला प्राधान्य दिलं होतं. दोघेही विकेटकीपर फलंदाज आहेत. ऋषभ पंत आशिया कपमध्ये प्रभावी कामगिरी करु शकला नव्हता. त्यामुळे ऋषभला बसवून कार्तिकला संधी द्यावी, अशी मागणी सुरु आहे. पण रोहित शर्मा-राहुल द्रविड जोडगळी असं पाऊल उचलण्याची शक्यता कमी आहे.
कोणाला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार नाही?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात दिनेश कार्तिक आणि दीपक हुड्डाला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार नसल्याची माहिती आहे. इनसाइट स्पोर्ट्ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
दोघांचा फिटनेस तपासणं आवश्यक
टीममध्ये कमबॅक करणारे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात येईल. या दोघांना संधी मिळणं आवश्यक आहे. कारण आशिया कप टुर्नामेंटमध्ये दोघे दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते. त्यांचा फिटनेस तपासण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरीज महत्त्वाची आहे. टी 20 वर्ल्ड कपआधी टीम इंडिया एकूण सहा आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.
दीपक हुड्डाच्या जागी कोण?
दिनेश कार्तिकला संधी मिळणार नसेल, तर त्याच्याजागी ऋषभ पंतला समावेश निश्चित आहे. पण दीपक हुड्डाच्या जागी कोण?. हुड्डाच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळू शकते. तो ऑलराऊंडर आहे. बॉलिंग बरोबर तो बॅटिंगही करु शकतो.