नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दोन्ही टीम्सनी बऱ्याच काळापासून परस्परांच्या देशांचा दौरा केलेला नाही. दोन्ही टीम्स फक्त आयसीसी इव्हेंटमध्ये आमने-सामने येतात. यावर्षी आशिया कप आणि वर्ल्ड कप स्पर्धा खेळली जाणार आहे. आशिया कप पाकिस्तानात आणि वर्ल्ड कप टुर्नामेंट भारतात होणार आहे. दोन्ही देशाच्या क्रिकेट बोर्डांनी परस्परांच्या देशांचा दौरा करण्यास मनाई केली आहे. क्रिकेटच्या मैदानात दोन्ही टीम्स कधी आमने-सामने असतील, हे सांगता येण कठीण आहे.
पण खेळावर प्रेम करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पुढच्या 3 महिन्यात 2 वेळा पाकिस्तानी टीम भारतात येणार आहे. हे क्रिकेटच्या मैदानात होणार नसून दुसऱ्या खेळात घडणार आहे.
आशियाई चॅम्पियनशिपसाठी येणार
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने घोषणा केली आहे. पुढच्या महिन्यात साऊथ एशियन फुटबॉल चॅम्पियनशिपसाठी पाकिस्तानी टीम बंगळुरमध्ये येणार आहे. भारत आणि पाकिस्तानी टीम एकाच ग्रुपमध्ये आहेत. पाकिस्तानी हॉकी टीमने सुद्धा कन्फर्म केलय. ऑगस्ट महिन्यात आशियाई चॅम्पियनशिपसाठी ते चेन्नईमध्ये येतील.
NOC ची मागणी
पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे जनरल सचिव हैदर हुसैन यांनी, मागच्या आठवड्यात आपल्या देशाच्या खेळ बोर्डाकडे लेटर लिहून भारत दौऱ्यासाठी NOC ची मागणी केली होती. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलय. पाकिस्तानी टीम चेन्नईमध्ये जरुर येईल, असं हुसैन यांनी व्हिडिओ मेसेजमध्ये म्हटलं होतं. फुटबॉल आणि हॉकी फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ते फिफा आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या नियमांना बांधील आहेत. कुठल्याही देशाबरोबर भेदभाव करता येत नाही.
भारताला बसलेला झटका
जवळपास 4 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटीने भारताचे ग्लोबल इवेंट्स आयोजित करण्याचे अधिकार निलंबित केले होते. नवी दिल्लीत होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी सरकारने पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा दिला नव्हता. क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये समावेश होत नाही. त्यामुळे त्यांना नियम लागू होत नाही.