लखनौ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये काल 43 वा सामना खेळला गेला. हा सामना कोण जिंकलं?, कोण हरलं? यापेक्षा वादावादीमुळे जास्त गाजला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा विराट कोहली आणि लखनौ सुपर जायंट्सचा गौतम गंभीर यांच्यात मॅच संपल्यानंतर जोरदार वाजलं. त्याशिवाय या मॅचमध्ये आणखी काही वादाचे प्रसंग घडले. फक्त विराट कोहली या सगळ्या वादांच्या केंद्रस्थानी होता. मॅच संपल्यानंतर खेळाडू परस्परांशी हस्तांदोलन करत होते, त्यावेळी नवीन-उल-हक बरोबर विराटची शाब्दीक बाचाबाची झाली.
त्याशिवाय मॅच सुरु असताना, रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या आणखी एका खेळाडूबरोबर विराट कोहलीच वाजलं. कालचा सामना RCB ने जिंकला. आरसीबीने पहिली बॅटिंग करताना, निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 126/9 धावा केल्या.
आधी काय झालेलं?
प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सचा डाव 108 धावात आटोपला. RCB ने 18 धावांनी विजय मिळवला. याआधी दोन्ही टीम्समध्ये झालेल्या सामन्यात लखनौने विजय मिळवला होता. त्यावेळी लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीरच्या एका कृतीवरुन वाद झाला होता.
#ViratKohli This is the moment when whole fight started between Virat Kohli and LSG Gautam Gambhir
Amit Mishra
Naveen ul haq#LSGvsRCB pic.twitter.com/hkId1J33vY— Mehulsinh Vaghela (@LoneWarrior1109) May 1, 2023
गंभीर, नवीन उल हक शिवाय विराट अजून कोणाबरोबर भांडला?
कालच्या सामन्यात लखनौसमोर छोटं लक्ष्य होतं. पण आरसीबीच्या बॉलर्सनी भन्नाट बॉलिंग केली. पावरप्लेच्या अखेरीस 5 बाद 38 अशी लखनौची स्थिती होती. सामना जसा पुढे सरकत गेला, तशा गोष्टी बदलत गेल्या. आपल्याच टीमच्या वानिंदु हसरंगावर सुद्धा विराट कोहली चिडला होता. 16 व्या ओव्हरच्या अखेरीस विराटची क्रीजवर असलेल्या अमित मिश्रा सुद्धा सोबत वादावादी झाली. विराट कोहली अमित मिश्रावर ओरडताना दिसला. मैदानावरील पंचांनी मध्यस्थी करेपर्यंत दोघे थांबले नाहीत.
आयपीएल मॅनेजमेंटची कारवाई
दरम्यान कालच्या सामन्यात झालेल्या वादावादी प्रकरणात विराट कोहली, गौतम गंभीर, नवीन उल हक यांच्यावर आयपीएल मॅनेजमेंटने कारवाई केली आहे. विराट आणि गंभीरची 100 टक्के मॅच फी कापण्यात आली आहे. त्याचवेळी नवीन उल हकची 50 टक्के मॅच फी कापण्यात आली.