मुंबई: टीम इंडियाचे दोन स्टार क्रिकेटर लवकरच विवाहाच्या बोहल्यावर चढणार आहेत. केएल राहुलच्या लग्नाची मागच्यावर्षीपासून चर्चा आहे. चालू जानेवारी महिन्यात तो लग्न करु शकतो. अभिनेता सुनील शेट्टीच्या लोणावळ्यातील बंगल्यात केएल राहुल अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत जन्मोजन्मीसाठी विवाहबंधनात अडकेल. टीम इंडियातील आणखी एक खेळाडू याच दरम्यान लग्न करणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा दुसरा प्लेयर कोण आहे?. हा क्रिकेटर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या चालू टी 20 सीरीज आणि वनडे मालिकेत त्याने ऑलराऊंडर प्रदर्शन केलय.
याच महिन्यात करणार लग्न
हा स्टार ऑलराऊंडर आहे, अक्षर पटेल. लवकरच तो नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. अक्षर पटेल भावी वधू मेहा पटेलसोबत याच महिन्यात लग्न करणार आहे. बीसीसीआयने याच कारणामुळे त्याची न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी 20 सीरीजसाठी निवड केलेली नाही. त्याला सुट्टी दिली आहे. बोर्डाने टीमची घोषणा करताना सांगितलं की, कौटुंबिक कारणांमुळे अक्षर पटेल सीरीजसाठी उपलब्ध नसेल.
कधी प्रपोज केलं?
अक्षर बऱ्याच काळापासून मेहाला डेट करतोय. मागच्यावर्षी आपल्या वाढदिवशी 20 जानेवारीला त्याने रोमँटिक अंदाजात मेहाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्याने स्वत: फोटो शेयर करुन याबद्दल माहिती दिली होती.
त्याची बायको काय करते?
अक्षर पटेलची होणारी बायको मेहा पेशाने डायटिशियन आणि न्यूट्रीनिस्ट आहे. ती अक्षरच्या डायटची सुद्धा काळजी घेते. त्याशिवाय तिला फिरण्याची सुद्धा भरपूर आवड आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर अक्षरसोबत तिचे अनेक फोटो आहेत.
हातावर टॅटू
मेहा अक्षरवर किती प्रेम करते, त्याचा अंदाज तिच्या हातावरील टॅटूमधूनच येतो. तिने हातावर ‘AKSH’ असा टॅटू गोंदवून घेतलाय. अक्षर पटेलच्या नावाच्या सुरुवातीच हे अक्षर आहे. मेहाने आयपीएल मॅचचे फोटो देखील पोस्ट केलेत. ज्यात ती अक्षरसाठी चियर करताना दिसते.
रवींद्र जाडेजाची जागा घेणार?
अक्षर पटेल हळूहळू टीम इंडियात आपलं स्थान पक्क करतोय. ऑलराऊंडर म्हणून त्याने स्वत:ची ओळख प्रस्थापित केलीय. रवींद्र जाडेजाप्रमाणे अक्षर डावखुरा फिरकी गोलंदाज आणि लेफ्टी बॅटिंग करतो. टीम इंडियात रवींद्र जाडेजाच जे स्थान आहे, ती जागा हळूहळू अक्षर भरुन काढतोय. यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. अक्षरचा हाच फॉर्म कायम राहिला, तर तो या वर्ल्ड कपमध्ये रवींद्र जाडेजाच्या जागी खेळताना दिसू शकतो.