मुंबई: नोव्हाक जोकोव्हिचने (novak djokovic) 21 वी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. विम्बल्डन 2022 च्या फायनल मध्ये जोकोव्हिचने निक किरियोसवर विजय मिळवला. चार सेट पर्यंत चाललेल्या या सामन्यात जोकोव्हिचने 4-6, 6-2, 6-4, 7-6 असा विजय मिळवला. जोकोव्हिचने 7 व्यां दा विम्बल्डन स्पर्धेच जेतेपद पटकावलं. जोकोव्हिचला जेतेपदासाठी 19.23 कोटी रुपयांची इनामी रक्कम मिळाली. या जेतेपदानंतर जोकोव्हिचच्या नेटवर्थ (Net worth) म्हणजे संपत्तीबद्दल इंटरनेटवर (Internet) सर्च केलं जातय. जोकोव्हिच शिवाय भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेण्यातही नेटीझन्सना भरपूर रस आहे. 21 वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धेच जेतेपद पटकावणारा नोव्हाक जोकोव्हिच एकूण संपत्तीच्या बाबतीत सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या खूपच पुढे आहे.
माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीची संपत्ती 892 कोटीच्या आसपास आहे. यात त्याचा पगार, जाहीरात आणि मॅच कमाईचा समावेश आहे. caknowledge नुसार, विराटची महिन्याभराची कमाई 4 कोटी रुपये आहे. वर्षाची कमाई 48 कोटींच्या घरात आहे. कोहली इंडियन सुपर लीग मधील एफसी गोवा संघाचा सहमालक आहे. जाहीराती मधूनही विराट घसघशीत कमाई करतो. 17 कोटीपेक्षा पण जास्त कमाई तो फक्त जाहीरातींमधून करतो. प्रतिदिवस तो 2 कोटी रुपये चार्ज करतो.
सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती विराट कोहली पेक्षा जास्त आहे. सचिन क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाला आहे. पण अजूनही जाहीरात, प्रॉपर्टी, गुंतवणूक यातून तो कमाई करतो. मुंबई आणि बंगळुरुत सचिनचे दोन रेस्टॉरंट आहेत. त्याची नेटवर्थ 1240 कोटीपेक्षा पण जास्त आहे. सचिनकडे 10 आलिशान कारस आहेत. मुंबईतील त्याच्या घराची किंमत 60 कोटी पेक्षा पण जास्त आहे.
नोव्हाक जोकोव्हिचची नेटवर्थ 17 अब्जपेक्षा जास्त आहे. Celebritynetworth नुसार, जुलै 2021 मध्ये पहिल्यांदा जोकोव्हिचची कमाई 150 मिलियन डॉलरपर्यंत पोहोचली होती. 2021 मध्ये जोकोव्हिचने टेनिस स्पर्धा जिंकून सर्वाधिक कमाई केली होती. त्या सीजन मध्ये त्याने 12 मिलियन डॉलरची कमाई केली होती. 2012 मध्ये जोकोव्हिचने पाच वर्षांसाठी मोठी डील साईन केली. त्यातून त्याने दरवर्षी 8 मिलियन युरोची कमाई केली. जून 2017 ते जून 2018 दरम्यान जोकोव्हिचने पगार आणि जाहीरातींमधून 24 मिलियन डॉलरची कमाई केली. त्याच्या पुढच्यावर्षी ही कमाई 50 मिलियन डॉलरपर्यंत पोहोचली.