NZ vs ENG Test : क्रिकेट एक रोमांचक खेळ आहे. पण क्रिकेटच्या मैदानात काहीवेळा अशा घटना घडतात, की ज्यामुळे तुम्हाला हसू आवरता येत नाही. वेलिंग्टन कसोटीत इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन बेन फोक्स विचित्र पद्धतीन आऊट झाला. सोशल मीडियावर या विकेटची चर्चा आहे. फोक्स क्रीजवरच पडला पण तो स्वत:ला स्टम्पआऊट होण्यापासून वाचवू शकला नाही. वेलिंग्टनच्या पीचवर बेन फोक्स आऊट झाला. पण त्याचं बाद होणं सोशल मीडियाच्या पीचवर व्हायरल झालं.
वेलिंग्टन कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावात फोक्स बाद झाला. फोक्सने पहिल्या इनिंगमध्ये 5 चेंडूंचा सामना केला. पण तो खातं उघडू शकला नाही. तो एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला.
क्वचितच कोणी असं OUT होतं
न्यूझीलंडचा स्पिनर मायकल ब्रेसवेलने बेन फोक्सचा विकेट घेतला. ब्रेसवेलच्या चेंडूवर विकेटकीपर टॉम ब्लंडलने त्याची स्टम्पिंग केली. हा व्हिडिओपाहून फोक्स कशा पद्धतीने स्टम्पआऊट झाला, ते तुमच्या लक्षात येईल.
Oh dear Foakes…
Bracewell has the English batters falling for him ☝️
A small flurry of wickets before the new ball for the Black Caps ??#NZvENG pic.twitter.com/KqqFB5d6MI
— Cricket on BT Sport (@btsportcricket) February 24, 2023
ब्लंडेलने क्षणाचाही विलंब नाही केला
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, ब्रेसवेलचा चेंडू खेळण्यासाठी फोक्स स्टेपआऊट झाला. तो क्रीझच्या बाहेर आला. पण त्याचवेळी फोक्सचा पाय घसरला. न्यूझीलंडचा शार्प विकेटकीपर टॉम ब्लंडेलने या चुकीचा लगेच फायदा उचलला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता फोक्सला स्टम्पआऊट केलं. फोक्स पाय घसरुन मैदानात पडला. त्याने आपला विकेट वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
बेन फोक्स पहिल्या इनिंगमध्ये खात उघडू शकला नाही.पण इंग्लंडने आपला पहिला डाव 8 विकेटवर 435 धावांवर घोषित केला.
लॅथमने गाठला महत्त्वाचा टप्पा
टॉम लॅथमने वेलिंग्टन कसोटीच्या दुसऱ्याडावात अर्धशतकी खेळी केली. या दरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमधील 5000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा 7 वा फलंदाज ठरला. 72 व्या कसोटीच्या 127 व्या इनिंगमध्ये टॉम लॅथमने हा टप्पा गाठला. वेलिंग्टन कसोटीच्या दुसऱ्याडावात झळकवलेलं अर्धशतक टेस्ट करिअरमधील 26 व अर्धशतक ठरलं.