मुंबई: पाकिस्तानच्या टीमने न्यूझीलंडमध्ये (NZ vs PAK) तिरंगी मालिका (Tri Series) जिंकली आहे. फायनलमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडवर 5 विकेट राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 163 धावा केल्या. 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला पाकिस्तानची टीम (Pakistan Team) मैदानात उतरली होती. त्यांनी 5 विकेट गमावून 3 चेंडू राखून विजय मिळवला.
फ्लॉप फलंदाज या विजयाचे हिरो
इफ्तिकार अहमदने 20 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकून पाकिस्तानचा विजय निश्चित केला. पाकिस्तानचे फ्लॉप फलंदाज या विजयाचे हिरो ठरले. पाकिस्तानच्या मिडल ऑर्डरमधील फलंदाजांवर सातत्याने टीका सुरु होती. याच फलंदाजांनी पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
हा विजय पाकिस्तानसाठी टॉनिक सारखा
आजच्या मॅचमध्ये बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान दोघेही फ्लॉप ठरले, तरी पाकिस्तानने विजय मिळवला. न्यूझीलंडमध्ये तिरंगी मालिकेच्या विजेतपदामुळे निश्चितच पाकिस्तानला आत्मविश्वास उंचावेल. T20 वर्ल्ड कप 2022 आधी हा विजय पाकिस्तानसाठी टॉनिक सारखा आहे. आयसीसी टुर्नामेंटमध्ये या विजयाचा परिणाम दिसू शकतो.
Sealed with a six! ?
Pakistan win the #NZTriSeries final by five wickets ?#PAKvNZ pic.twitter.com/5Ga5tPhdme
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 14, 2022
बाबर-रिजवान शिवाय जिंकला पाकिस्तान
वर्ल्ड कपआधी पाकिस्तानला अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत. त्यामुळे हा विजय पाकिस्तानसाठी मोठा आहे. पाकिस्तानच्या मिडल ऑर्डरबद्दल अनेक प्रश्न होते. बाबर आणि रिजवानशिवाय पाकिस्तान कसा जिंकणार? असा प्रश्न विचारला जात होता. या प्रश्नाच उत्तर या मॅचमध्ये मिळालं.
बाबर-रिजवानने किती धावा केल्या?
फायनलमध्ये बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान टीमचा भाग होते. पण दोघे मोठे इनिंग खेळू शकले नाहीत. पाकिस्तानसमोर 164 धावांचे लक्ष्य होते. बाबरने 14 चेंडूत 15 धावा आणि रिजवान 29 चेंडूत 34 धावा करुन आऊट झाला. या दोघांमध्ये भागीदारी झाली नाही. मिडल ऑर्डर आवश्यक धावा केल्याने पाकिस्तानने हा सामना जिंकला.
कालचे फ्लॉप आजचे हिरो
पाकिस्तानसाठी मोहम्मद नवाज नाबाद इनिंग खेळला. त्याने 22 चेंडूत 38 धावा केल्या. मागच्या दोन सामन्यात हैदर अली अपयशी ठरला. त्याने 15 चेंडूत 31 धावा केल्या. इफ्तिकार अहमदने 14 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. त्याने षटकार ठोकून पाकिस्तानचा विजय सुनिश्चित केला.