NZ Vs PAK Probable Playing XI: न्यूझीलंडकडे पाकिस्तानचा गेम ओव्हर करणारी टीम

| Updated on: Nov 08, 2022 | 7:31 PM

NZ Vs PAK Probable Playing XI: उद्या दोन्ही टीम्सची काय प्लेइंग 11 असेल? पाकिस्तान इतिहासाची पुनरावृत्ती करेल?

NZ Vs PAK Probable Playing XI: न्यूझीलंडकडे पाकिस्तानचा गेम ओव्हर करणारी टीम
pak vs nz
Image Credit source: AFP
Follow us on

सिडनी: T20 वर्ल्ड कपची 2022 ची पहिली सेमीफायनल उद्या होणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या टीममध्ये सामना होईल. न्यूझीलंडची टीम ग्रुप 1 मध्ये टॉपवर होती. त्यांनी सर्वप्रथम सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. पाकिस्तानने ग्रुप 2 मधून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानची सुरुवात खराब झाली होती. पण नशीब आणि मेहनतीच्या बळावर पाकिस्तानी टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. आता पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या टीममध्ये सामना आहे. जिंकणारी टीम फायनलमध्ये प्रवेश करेल.

दोन पैकी कुठली टीम सरस?

दोन पैकी कुठली टीम सरस? हा प्रश्न आहे. आकडे पाहिल्यास पाकिस्तानचा संघ सरस आहे. टी 20 च्या पीचवर दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत 28 सामने झाले आहेत. पाकिस्तानने त्यापैकी 17 मॅचमध्ये विजय मिळवलाय. टी 20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानने न्यूझीलंडला 4 वेळा हरवलय.

सेमीफायनलमध्ये कितीवेळा आमने-सामने आल्या

दोनवेळा पाकिस्तानचा पराभव झालाय. आयसीसी टुर्नामेंट्समध्ये दोन्ही टीम्स 3 वेळा सेमीफायनलमध्ये आमने-सामने आल्या आहेत. प्रत्येकवेळी पाकिस्तानची टीम जिंकली आहे. यावेळी न्यूझीलंडची बाजू वरचढ आहे. कारण त्यांची टीम पाकिस्तानपेक्षा जास्त संतुलित आहे. दोन्ही टीम्स कुठल्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरणार ते जाणून घेऊया.

न्यूझीलंडची टीम संतुलित

न्यूझीलंडच्या टीममध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. विलियमसनची टीम फिन एलेन आणि ग्लेन फिलिप्सच्या बळावर पाकिस्तानी गोलंदाजीचा सामना करेल. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, टिम साऊदीची जोडी पाकिस्तानी फलंदाजांना हैराण करु शकते. न्यूझीलंडची टीम 5 फलंदाज, 2 ऑलराऊंडर आणि 3 गोलंदाजांसह मैदानात उतरेल. त्यांच्याकडे सँटनर आणि सोढी सारखे चांगले फिरकी गोलंदाज आहेत.

न्यूजीलंडची संभाव्य प्लेइंग इलेवन- फिन एलेन, डेवन कॉन्वे, केन विलियमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउदी, ईश सोढ़ी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

पाकिस्तानकडे मजबूत गोलंदाजी

पाकिस्तानची फलंदाजी कमकुवत आहे. पण गोलंदाजी बळकट आहे. त्यांच्या फक्त एका बॉलरचा इकॉनमी रेट प्रति ओव्हर 7 रन्सपेक्षा जास्त आहे. फलंदाजीत टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर फार काही विशेष चमक दाखवू शकलेला नाही.

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेवन- मोहम्मद रिजवान, बाबर आजम (कॅप्टन), मोहम्मद नवाज, मोहम्मद हारिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, हॅरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी,