World cup 2023 | PCB ची Action, बाबर आजमआधी ‘या’ दोघांवर चालवणार कुऱ्हाड

| Updated on: Nov 14, 2023 | 10:28 AM

World cup 2023 | वर्ल्ड कपमध्ये लीग स्टेजमध्येच आव्हान संपल्याच दु:ख. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड कोणा-कोणावर कुऱ्हाड चालवणार. बाबर आजमआधीच दुसऱ्यावर कारवाई झाली आहे.

World cup 2023 | PCB ची Action, बाबर आजमआधी या दोघांवर चालवणार कुऱ्हाड
Babar Azam odi world cup 2023
Follow us on

लाहोर : वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानी टीमने खराब प्रदर्शन केलं. या कामगिरीनंतर PCB कडून कारवाई होण अपेक्षित होतं. आता पीसीबीने तशी पावल उचलायला सुरुवात केली आहे. सर्वात आधी बाबर आजमवर कारवाई होईल अशी अपेक्षा होती. पण बाबर आजमच्या आधी अन्य दोघांवर कारवाई झाली आहे. आपण व्यक्तीगत स्तरावर वर्ल्ड कपमध्ये खराब खेळ दाखवलाय हे बाबर आजमला मान्य नाहीय. बाबर आजमच्या आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मिकी आर्थर आणि ग्रांट ब्रॅडबर्न या दोघांवर हंटर चालवलाय. या दोघांचा करार संपवण्याचा निर्णय घेतल्याचा रिपोर्ट आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टीमचे डायरेक्टर मिकी आर्थर आणि कोच ग्रांट ब्रॅडबर्न यांना पदावरुन बर्खास्त करण्याचा निर्णय घेतलाय. समा न्यूजने हे वृत्त दिलय. या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होणं अजून बाकी आहे. 14 नोव्हेंबरला या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं.

PCB चीफ जका अशरफ 14 नोव्हेंबरला पाकिस्तानची टीमचा माजी कर्णधार यूनिस खानशी चर्चा करतील. त्यावेळी मिकी आर्थर आणि ग्रांट ब्रॅडबर्न यांना हटवण्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. पाकिस्तानी मीडियाने हे वृत्त दिलय. बाबर आजमच्या नेतृत्वाबद्दल निर्णय घेणं, हा सुद्धा बैठकीचा उद्देश असू शकतो. म्हणजे कर्णधार म्हणून बाबर आजमच्या नशिबाचा निर्णय होऊ शकतो. टीममधल्या खेळाडूंनी बाबरच समर्थन केल्याच वृत्त आहे. आता चेंडू pcb च्या कोर्टात आहे. त्यांनाच अंतिम निर्णय घ्यायचा आहे.

पाकिस्तानने या वर्ल्ड कपमध्ये किती मॅच जिंकल्या?

वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी टीमने चांगलं प्रदर्शन केलं नाही. टुर्नामेंटमध्ये पाकिस्तानी टीम शेवटच्या 9 व्या स्थानावर राहिली. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानी टीमचा 5 मॅचमध्ये पराभव झाला. 4 मॅच जिंकल्या. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये टीम कुठेही बॅलन्स वाटली नाही. परफॉर्मन्समध्ये सातत्य नव्हतं. फलंदाजी ते गोलंदाजी बाबरच्या नेतृत्वगुणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. त्यामुळे पाकिस्तानी टीममध्ये काही बदल होऊ शकतात.