मुंबई : यंदाचा वनडे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होईल. त्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून वर्ल्ड कप ट्रॉफीचा प्रमोशन ट्रॉफी टूर सुरु आहे. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये ही ट्रॉफी फिरवली जात आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतातील 10 शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने आयोजित करण्यात येणार आहेत. मागच्या महिन्यात मुंबईत एका शानदार कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून वर्ल्ड कप शेड्युलची घोषणा करण्यात आली.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचा पहिला आणि फायनलचा सामना होणार आहे. बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, धर्मशाळा, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने आयोजित करण्यात येणार आहेत.
वर्ल्ड कपचा पहिला सामना कुठल्या दोन टीममध्ये?
2019 मधील वर्ल्ड कप विजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड सामन्याने वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना पाचवेळच्या वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. 8 ऑक्टोबरला चेन्नईत ही मॅच होईल. पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये 4 नोव्हेंबरला तसच टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होईल.
The ICC Men’s Cricket World Cup Trophy Tour 2023 was launched on a stratospheric scale ?
Countdown to cricket’s greatest spectacle has begun ?
More ➡️ https://t.co/mKCK0WYxIg
#CWC23 pic.twitter.com/Tphyn9Qvxm
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 27, 2023
वर्ल्ड कप ट्रॉफीचा प्रमोशनल टूर
सध्या वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीचा प्रमोशनल टूर सुरु आहे. ही ट्रॉफी सध्या मुंबईत आली आहे. आज मंगळवारी मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे स्कॉटिश शाळेत ही ट्रॉफी ठेवण्यात आली आहे. मुंबईत 20 शालेय क्रिकेट टीम ही ट्रॉफी पाहण्यासाठी येतील.
मुंबईतल्या कुठल्या शाळेत येणार वर्ल्ड कप ट्रॉफी?
“आमच्या शाळेत वर्ल्ड कपची ट्रॉफी येणार आहे. ट्रॉफी टूरचा हा भाग आहे. कोलकाता, लेह येथून ही ट्रॉफी मुंबईत येईल. आमची मुंबईतील एकमेव शाळा आहे, जिथे ही ट्रॉफी येणार आहे” असं बॉम्बे स्कॉटिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता जॉर्ज यांनी सांगितलं.