अहमदाबाद : टीम इंडियाला वर्ल्ड कपमधला पुढचा सामना पाकिस्तान विरुद्ध खेळायचा आहे. टीम इंडियासाठी हा खूप महत्त्वाचा सामना आहे. टीम इंडिया कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. मायदेशात पाकिस्तान विरुद्ध पराभव स्वीकारायचा नाही, हाच टीम इंडियाचा उद्देश असेल. टीम इंडिया अजूनपर्यंत तरी वनडे वर्ल्ड कपमध्ये एकदाही पाकिस्तान विरुद्ध हरलेली नाही. हाच विजयी सिलसिला पुढे चालू ठेवायचा आहे. 1992 पासून टीम इंडिया सातत्याने वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध जिंकत आली आहे. रोहित शर्मा आपल्या नेतृत्वाखाली हा रेकॉर्ड कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. या मॅचसाठी रोहित शर्माला टीमच्या प्लेइंग 11 बद्दल काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. मोहम्मद सिराज टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज आहे. त्याने आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केलय.
वनडे रँकिंगमध्ये तो नंबर 1 गोलंदाज होता. पण पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी मोहम्मद सिराजला प्लेइंग 11 बाहेर बसवलं जाऊ शकतं. रोहित शर्मा प्लेइंग 11 मध्ये सिराजच्या जागी मोहम्मद शमीला संधी देऊ शकतो. त्याच्यामागे काही कारण आहेत. मोहम्मद शमी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळतो. तो या टीमचा मुख्य गोलंदाज आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आयपीएलमधील गुजरात टायटन्स टीमचे हे होम ग्राऊंड आहे. त्यामुळे मोहम्मद शमीला या पीचवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. पाकिस्तानला वेसण घालण्यात शमी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
मोहम्मद शमी टीममध्ये का हवा?
या पीचवर कशी गोलंदाजी करायची ? हे शमीला चांगल ठाऊक आहे. पाकिस्तानी फलंदाजांना मोहम्मद शमी अडचणीत आणू शकतो. त्यामुळे मोहम्मद शमीचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्याचा रोहित शर्माचा प्रयत्न असेल. रोहित शर्मा मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीला का खेळवणार?. सिराजच अलीकडच्या काही सामन्यातील प्रदर्शन हे सुद्धा त्यामागे एक कारण आहे. सिराजने आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये दमदार गोलंदाजी केली होती. श्रीलंके विरुद्ध 6 विकेट घेतले होते. पण त्यानंतर सिराजच्या प्रदर्शनाचा ग्राफ घसरलाय. त्यानंतर त्याने तीन सामन्यात फक्त एक विकेट घेतलाय. इतकच नाही, त्याची इकॉनमी सुद्धा बिघडलीय. त्याने भरपूर धावा दिल्यात. हे पाहता रोहित सिराजला प्लेइंग इलेव्हन बाहेर करु शकतो आणि त्याजागी शमीला संधी देईल.