तिरुवनंतपुरम : दक्षिण आफ्रिकेची टीम वनडे वर्ल्ड कपसाठी भारतात आलीय. सध्या दक्षिण आफ्रिकेची टीम केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये मुक्कामाला आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम तिरुवनंतपुरममध्येच पहिला सराव सामना खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा सराव सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. मॅचमध्ये ते कसं प्रदर्शन करणार? हे सगळ्यांना समजेलच. पण प्रोटियाज टीमचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ खूप फनी आहे. तुम्ही पोट धरुन खळखळून हसाल असा हा व्हिडिओ आहे. तुमच हसणच थांबवणार नाही. या व्हिडिओमध्ये दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू एक नाव घेण्याचा प्रयत्न करतायत. तिरुवनंतपुरममध्ये टीम उतरली आहे, त्या शहराच नाव घेण्याचा ते प्रयत्न करतायत. त्यांना त्या शहराच नाव उच्चारता येत नाहीय.
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी एकापाठोपाठ एक तिरुवनंतपुरम शहराच नाव घेण्यास सुरुवात केली. अनेक खेळाडू शहराच नाव नीट उच्चारु शकले नाहीत. त्यांनी ज्या पद्धतीने नाव घेतलं, ते पाहून तुम्ही तुमच हसू रोखू शकणार नाही. हा व्हिडिओ चर्चेत असून तो व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये दक्षिण आफ्रिकन टीममधील फक्त 4 सदस्यांनी तिरुवनंतपुरम हे नाव व्यवस्थित घेतलं. यात रबाडा, लुंगी आणि केशव महाराजशिवाय एक सपोर्ट स्टाफचा सदस्य आहे. अन्य खेळाडूंनी खूप विचित्र पद्धतीने तिरुवनंतपुरम नाव पुकारलं.
The South African have arrived in Thiruvananthapuram ! But can they tell anyone where they are? pic.twitter.com/N9LnyVLVH9
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 1, 2023
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना कधी
दक्षिण आफ्रिकेची टीम 7 ऑक्टोबरपासून श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याने आपल्या वर्ल्ड कप अभियानाची सुरुवात करेल. 10 नोव्हेंबरला अफगाणिस्तान विरुद्ध शेवटचा सामना खेळतील. टीम इंडिया विरुद्ध 5 नोव्हेंबरला कोलकाताच्या इडन गार्डन्सवर सामना होईल.