मुंबई: क्रिकेट विश्वात सध्या टी 20 वर्ल्ड कपची (T20 World Cup) चर्चा आहे. पण भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) आपल्या अंतर्गत राजकारणामुळे चर्चेत आहे. विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. गांगुली यांनी योग्य पद्धतीने काम केलं नाही. त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, असा ठपका सौरव गांगुली यांच्यावर ठेवण्यात आला. बीसीसीआय आर्थिक कारणांमुळेही चर्चेत आहे. त्यांचं 900 कोटी रुपयांपेक्षा अधिकच नुकसान होणार आहे.
भारतात वर्ल्ड कप कधी आहे?
पुढच्यावर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. एक वर्षानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीसीसीआय वनडे वर्ल्ड कप 2023 चं यजमानपद भूषवणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषेदच्या काही अटी आहेत. त्यात टॅक्सवर सवलतीची अट महत्त्वाची आहे. आयसीसीच्या याच अटीने बीसीसीआयला अडचणीत आणलं आहे.
टॅक्स संबंधात बीसीसीआयची काय मागणी आहे?
बीसीसीआय केंद्र सरकारकडे दिलासा देण्याची मागणी करत आहे. पण सरकारने बोर्डाला झटका दिलाय. टुर्नामेंट ब्रॉडकास्टमधून होणाऱ्या कमाईवर सरकारने 21.84 टक्के टॅक्स लावण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे बीसीसीआयच कोट्यवधी रुपयांच नुकसान होणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, केंद्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिलं, तर भारतीय बोर्डाच जवळपास 955 कोटी रुपयांच नुकसान होईल.
भारतात वर्ल्ड कप स्पर्धा झाली, तर बीसीसीआयला टॅक्सची ही सर्व रक्कम भरावी लागेल. कारण आयसीसी यासाठी तयार होणार नाही. बोर्डाला हे नुकसान सोसाव लागेल.
टी 20 वर्ल्ड कपमध्ये किती नुकसान झालय?
भारताच्या टॅक्स कायद्यामध्ये अशा प्रकरच्या सवलतीची तरतूद नाहीय. याआधी 2016 साली टी 20 वर्ल्ड कप झाला. त्यावेळी सुद्धा बीसीसीआयला अशी सवलत मिळाली नव्हती. त्यावेळी 193 कोटी रुपयांच नुकसान झालं होतं.
भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमधून आयसीसीला किती हजार कोटी मिळणार?
21.84 टक्के टॅक्स द्यावा लागला, तर बोर्डाच्या आयसीसीकडून होणाऱ्या कमाईवर त्याचा विपरित परिणाम होईल. बीसीसीआयकडून कर अधिभार 21.84 टक्क्यावरुन 10.92 टक्क्यावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. आयसीसीच्या 2016 ते 2023 दरम्यानच्या महसूल पूलमध्ये बीसीसीआयचा हिस्सा 3336 कोटींचा आहे. भारतात 2023 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमधून आयसीसीला प्रसारणातून 4400 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.