मुंबई : टीम इंडियाला वर्ल्ड कप 2023 जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानल जात आहे. मायदेशात टीम इंडियाचा रेकॉर्ड, सर्व गोलंदाज आणि बॉलर्सचा फॉर्म आत्मविश्वास वाढवणारा आहे. त्यामुळेच क्रिकेट एक्सपर्ट्सपासून सर्वसामान्य रोहित अँड कंपनीला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानतायत. टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वात मोठी दावेदार आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच एक-दोन नाही, पाच टीम विरुद्ध रेकॉर्ड खूप खराब आहे. वर्ल्ड कपमध्ये पाच टीम्स अशा आहेत, ज्यांच्याविरुद्ध टीम इंडियाने बहुतांश सामने गमावलेत तसच या पाच टीम्स विरुद्ध जय-पराजयाच्या आकड्यामध्ये फार फरक नाहीय.
टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध 4 सामने गमावलेत. 3 सामन्यात विजय मिळवलाय. 2011 साली दोन्ही टीम्समध्ये वर्ल्ड कप मॅच टाय झाली. यावेळी इंग्लंड एक मजबूत संघ आहे. मागचा वर्ल्ड कप त्यांनी जिंकला होता. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियन टीमसमोर सुद्धा टीम इंडियाचा रेकॉर्ड खराब आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाने फक्त चार सामने जिंकलेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने डबल सामने जिंकलेत. ऑस्ट्रेलियाने आठवेळा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला हरवलय. ऑस्ट्रेलिया सोबत न्यूझीलंडची टीम सुद्धा टीम इंडियावर भारी पडलीय. न्यूझीलंडने वर्ल्ड कपमध्ये भारताला पाचवेळा हरवलय. तीनदा भारताने न्यूझीलंडला हरवलय.
वर्ल्ड कपमध्ये कुठल्या टीम्सना भारताला हरवणं कधीच शक्य झालेलं नाहीय?
दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कपमध्ये भारताला तीनवेळा हरवलय. तेच टीम इंडिया 2 सामने जिंकले आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारत आणि श्रीलंकेचे आकडे सुद्धा बरोबरीत आहेत. श्रीलंकेने वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला चारवेळा हरवलय तेच टीम इंडियाने श्रीलंकेला चारवेळा नमवलय. वर्ल्ड कपमध्ये भारत आणि श्रीलंकेत नेहमीच तोडीसतोड टक्कर झालीय. या वर्ल्ड कपमझ्ये अफगाणिस्तान, नेदरलँड्स, बांग्लादेश आणि पाकिस्तानच अशा टीम्स आहेत. ज्यांच्याविरुद्ध टीम इंडियाने पराभवापेक्षा विजय जास्त मिळवलाय. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स या टीम्सना वर्ल्ड कपमध्ये भारताला हरवणं कधीच शक्य झालेल नाहीत.