हरारे : वर्ल्ड कपच्या शर्यतीतून झिम्बाब्वेची टीम बाहेर गेली आहे. काल स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वेचा सामना झाला. या मॅचमध्ये झिम्बाब्वेला विजय आवश्यक होता. पण असं होऊ शकलं नाही. स्कॉटलंड विरुद्धचा सामना झिम्बाब्वेने 31 धावांनी गमावला. या पराभवामुळे भारतात येऊन वनडे वर्ल्ड कप खेळण्याच झिम्बाब्वेच स्वप्न भंग पावलं. आधी वेस्ट इंडिजची टीम वर्ल्ड कपमधून आऊट झाली. आता झिम्बाब्वे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे दोन्ही नावाजलेले संघ होते.
वर्ल्ड कप क्वालिफायरच्या सुपर सिक्स पॉइंट्स टेबलमध्ये सध्या झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडचे 6-6 पॉइंट्स आहेत. नेदरलँडसचे 4 अंक आहेत. झिम्बाब्वेची टीम लोअर रनरेटमुळे शर्यतीतून बाहेर गेली आहे. आता सर्व खेळ स्कॉटलंड आणि नेदरलँड्स या दोन टीममध्ये आहे.
एक टीम कन्फर्म, दुसरी कुठली?
क्वालिफायर राऊंडमध्ये टॉपवर असणाऱ्या दोन टीम्स वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार आहेत. श्रीलंकेच्या टीमने आधीच आपल तिकीट पक्क केलं आहे. पण दुसरी टीम कुठली? ते अजून ठरलेलं नाही. गुरुवारी 6 जुलैला स्कॉटलंड आणि नेदरलँड्सच्या टीममध्ये होणारी मॅच महत्वाची आहे.
विजयाच मार्जिन महत्वाच
6 जुलैला होणाऱ्या सामन्यात नेदरलँड्सच्या टीमने स्कॉटलंडला पराभूत केलं, तर त्यांचे 6 पॉइंट्स होतील. अशावेळी स्कॉटलंड आणि नेदरलँड्समध्ये पुढे कुठली टीम जाणार? नेदरलँड्सच्या टीमने स्कॉटलंडवर विजय मिळवल्यास विजयाच मार्जिन काय असेल? ते सुद्धा महत्वाच ठरणार आहे.
दोन्ही टीमसाठी पुढचा मार्ग कसा असेल?
नेदरलँड्सच्या टीमने 250 धावा करुन 83 धावांच्या फरकाने हरवलं, तर स्कॉटलंडचा रनरेट झिम्बाब्वेपेक्षा अजून खाली जाईल. अशावेळी नेदरलँड्सच्या टीमला भारतात वनडे वर्ल्ड कप खेळण्याच तिकीट मिळेल.
वर्ल्ड कपच तिकीट मिळवण्यासाठी सगळा रनरेटचा खेळ
स्कॉटलंडने नेदरलँड्सला हरवलं, नेदरलँड्सच्या पराभवाच मार्जिन 31 रन्सपेक्षा जास्त नसेल, तर अशा स्थितीत नेदरलँड्सच्या टीमला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळेल.
32 रन्सनी हरवाव लागेल
नेदरलँड्सच्या टीमने 250 धावा करुन त्यांनी स्कॉटलंडच्या टीमला 31 धावांनी हरवलं, तरी त्यांना वर्ल्ड कपच तिकीट मिळणार नाही, त्यांना स्कॉटलंडला 32 धावांनी पराभूत कराव लागेल. कारण त्याचवेळी स्कॉटलंडपेक्षा नेदरलँड्सचा रनरेट सरस होईल.