Odisha Train Accident मधील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीम इंडियाच्या एका खेळाडूकडून लाखाची मदत

| Updated on: Jun 06, 2023 | 9:05 AM

Odisha Train Accident : कोण आहे तो टीम इंडियाचा क्रिकेटर?. या भीषण रेल्वे अपघातात जवळपास 278 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 1100 प्रवासी जखमी झाले आहेत.

Odisha Train Accident मधील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीम इंडियाच्या एका खेळाडूकडून लाखाची मदत
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी अवघे काही तास शिल्लक असताना टीम इंडियाला दुखापतीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. संघाचा यष्टिरक्षक फलंदाज सरावादरम्यान जखमी झाला.
Follow us on

नवी दिल्ली : ओदिशा येथे शुक्रवारी संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. मागच्या काही वर्षातील हा सर्वात मोठा अपघात आहे. संपूर्ण देशाला या भीषण रेल्वे अपघाताने धक्का बसलाय. जवळपास 278 प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला असून 1100 प्रवासी जखमी झाले आहेत. या दु:खद प्रसंगात समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातून मदतीचे हात पुढे येत आहेत.

काही उद्योगपतींनी मदतीची घोषणा केलीय. आता यामध्ये टीम इंडियाचे काही क्रिकेटपटुही मागे नाहीयत. टीम इंडियातून खेळणाऱ्या एक प्रमुख प्लेयरने ओदिशा ट्रेन दुर्घटनेतील पीडितांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. त्याने आपला खारीचा वाटा उचललाय.


आणखी कुठला क्रिकेटर मदतीसाठी पुढे आला?

ओदिशा ट्रेन दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या क्रिकेटपटूच नाव आहे युजवेंद्र चहल. त्याने 1 लाख रुपयांची मदत केलीय. याआधी वीरेंद्र सेहवागने सुद्धा त्याच्या बाजूने मदतीचा प्रस्ताव दिला होता. या भीषण अपघातात ज्यांनी प्राण गमावले, त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची तयारी सेहवागने दाखवली आहे. वीरुने त्याच्या हरियाणा येथील सहवाग इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.


युजवेंद्र चहलची राजस्थान रॉयल्स टीम आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये क्वालिफाय करु शकली नाही. राजस्थानच्या टीमने 14 पैकी 7 सामने जिंकले होते.

विराट कोहलीने 30 कोटी रुपये दिले का?

युजवेंद्र चहलला मोबाइल गेम खेळायला खूप आवडतो. पब्जी सारखा गेम त्याला विशेष आवडतो. तो अनेकदा युट्यूबर्ससोबत हा गेम खेळताना दिसतो. याच दरम्यान त्याने डोनेशनची ही रक्कम दिली. अनेक युट्यूबर्सनी अशा प्रकारच स्ट्रीम केलय. ओदिशा ट्रेन दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी विराट कोहलीने 30 कोटी रुपये दिल्याची सोशल मीडियावर चर्चा होती. पण या सर्व अफवा असल्याच स्पष्ट झालं.