मुंबई : आजकालच्या ‘ऑनलाईन’ जीवनात सोशल मीडियाचं महत्त्व इतकं वाढलं आहे की जगभरातील प्रत्येक गोष्टीची माहिती सोशल मीडियावर असते. मोठमोठ्या सेलेब्रेटींपासून ते सामान्य व्यक्ती सगळेच आजकाल कमी जास्त प्रमाणात सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यात आज ‘World Social Media Day’ असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये श्रीलंका दौऱ्यासाठी (India Tour Of Sri Lanka) भारतीय संघाचा उप कर्णधार असणाऱ्या भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) आपल्या सोशल मीडियावरील काही अविस्मरणीय फोटोंबद्दलच्या आठवणी शेअर केल्या आहेत. (On World Social Media Day Indian Cricketer Bhuvneshwar Kumar Shares His Best Photos Memories Via Video Posted By BCCI)
व्हिडीओमध्ये सर्वांत आधी भुवनेश्वर कुमार त्याचा बालपणीच्या एका फोटोबद्दल सांगतो. ज्यात शाळेतील गणवेशात असणारा छोटा भूवी हातात बॅट घेऊन पोज देताना दिसतो आहे. या फोटो असणारी बॅट ही भूवी आणि त्याच्या मित्रांनी भागिदारीने पैसे काढून घेतली होती. जी दर दोन दिवसांसाठी एका कोणाकडे ठेवण्यात येत होती. जेव्हा भूवीकडे ही बॅट आली तेव्हा उत्सुक भुवीने शाळेचे कपडे न बदलता तसाच फोटो काढल्याचे सांगितले. त्यानंतर महेद्रसिंग धोनीच्या (M S Dhoni) निवृत्तीच्या वेळी पोस्ट केलेल्या फोटोबद्दल बोलताना भूवी म्हणाला, धोनी एक कर्णधारासह व्यक्ती म्हणून किती भारी होता हे सांगत धोनी सोबतच्या आठवणी जागवल्या. त्यानंतर भूवीने त्याचा कुत्रा अॅलेक्साबद्दलच्या काही आठवणी देखील शेअर केल्या. नंतर लग्नावेळीचा आणि कॉलेजच्या दिवसांतील फोटोंचा भूवीने व्हिडीओत आवर्जून उल्लेख केला.
Today on #SocialMediaDay, @BhuviOfficial relives some of his favourite Insta memories ?
Bhuvi talking about @msdhoni & his beloved dog is all heart ❤️#TeamIndia pic.twitter.com/4boMPZvlF5
— BCCI (@BCCI) June 30, 2021
सध्या भारताचे युवा खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर आहेत. टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यात पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै, दुसरा 16 जुलै आणि तिसरा 18 जुलैला खेळवला जाणार आहे. तर पहिला टी-20 सामना 21 जुलै, दुसरा 23 जुलै आणि तिसरा 25 जुलैला खेळवला जाईल. विशेष म्हणजे या दौऱ्यात बहुतांश नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर कर्णधार म्हणून शिखर धवन आणि उपकर्णधार म्हणून भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.
हे ही वाचा –
(On World Social Media Day Indian Cricketer Bhuvneshwar Kumar Shares His Best Photos Memories Via Video Posted By BCCI)