6,6,6,6, युसूफ पठाणचा तडाखा, या सामन्यात वादळी खेळी

| Updated on: Jan 18, 2024 | 1:56 PM

Yusuf Pathan | युसूफ पठाण याने टीम इंडियाला आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिलेत. युसूफ काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. मात्र युसूफचा तोडफोड अंदाज तसाच आहे. क्रिकेट चाहत्यांना अनेक वर्षांनी युसूफची ट्रेडमार्क खेळी पाहायला मिळाली.

6,6,6,6, युसूफ पठाणचा तडाखा, या सामन्यात वादळी खेळी
Follow us on

कर्नाटक | टीम इंडियाचे आणि इतर संघांचे माजी दिग्गज खेळाडू हे आज पुन्हा एकदा मैदानात आमनेसामने आले आहेत. टीम इंडियाच्या सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, युसूफ पठाण या आणि यासारखे खेळाडू क्रिकेटमधून निवृत्तीनंतर मैदानात आले आहेत. कर्नाटकातील मुद्देनहल्ली येथील सत्य साई ग्राममध्ये वन वर्ल्ड वन फॅमिली कप 2024 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. हा एका चॅरीटी सामना आहे. या एकमेव सामन्यात वन वर्ल्ड आणि वन फॅमिली अशा 2 टीम आहेत. वन वर्ल्ड टीमचं नेतृत्व सचिन तेंडुलकर याच्याकडे आहे. तर वन फॅमिली टीमची जबाबदारी सिक्सर किंग युवराज सिंह याच्याकडे आहे.

नाणेफेकीचा कौल वन वर्ल्ड टीमच्या बाजूने लागला. कॅप्टन सचिन तेंडुलकर याने फिल्डिंगचा निर्णय घेत युवराजच्या वन फॅमिलीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. युवराजच्या नेतृत्वात वन वर्ल्ड फॅमिली टीमने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. वन फॅमिलीकडून मॅडी याने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. कॅप्टन युवराज सिंह 10 बॉलमध्ये 23 धावा करुन आऊट झाला. कलुवथिराणा याने 22 धावांचं योगदान दिलं. मात्र युसूफ पठाण याचीच हवा पाहायला मिळाली.

युसूफने वय हा एक आकडा असतो, हे सिद्ध करुन दाखवलं. युसूफने त्याच ताकद आणि त्याच जोशाने वन वर्ल्ड विरुद्ध तडाखेदार खेळी केली. यूसफने 24 बॉलमध्ये 4 खणखणीत सिक्स आणि 1 चौकारच्या मदतीने वादळी 38 धावांची खेळी केली. तर वन वर्ल्ड टीमकडून हरभजन सिंह याने 30 धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर मॉन्टी पानेसर, अशोक दिंडा आणि सचिन तेंडुलकर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या.

वन वर्ल्ड टीमला 181 धावांच आव्हान

वन वर्ल्ड टीम | सचिन तेंदुलकर (कॅप्टन), नमन ओझा, उपुल थरंगा, अल्विरो पीटरसन, सुब्रमण्यम बद्रीनाथ, इरफान पठान, अशोक डिंडा, अजंता मेंडिस, हरभजन सिंह, मोंटी पनेसर, आरपी सिंह आणि डैनी मॉरिसन.

वन फॅमिली टीम | युवराज सिंह (कर्णधार), पार्थिव पटेल, मोहम्मद कैफ, डैरेन मैडी, आलोक कपाली, रोमेश कालूविथराना, यूसुफ पठान, जेसन क्रेजा, मुथैय्या मुरलीधरन, मखाया एंटिनी, चामिंडा वास आणि वेंकटेश प्रसाद.