IPL 2023 मध्ये अजून त्य़ाला एक विकेट मिळाला नाहीय, पण सिलेक्टर्सनी Team India त दिलं स्थान

| Updated on: Apr 28, 2023 | 3:01 PM

Team India : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये टीम इंडियातील एका खेळाडू पूर्णपणे फ्लॉप आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 फायनलसाठी त्याला टीम इंडियाच्या स्क्वाडमध्ये स्थान मिळालय.

IPL 2023 मध्ये अजून त्य़ाला एक विकेट मिळाला नाहीय, पण सिलेक्टर्सनी Team India त दिलं स्थान
Team india
Follow us on

Indian Cricket Team : टीम इंडियातील एका घातक वेगवान गोलंदाजाला आयपीएल 2023 मध्ये एकही विकेट मिळालेला नाहीय. आयपीएलच्या चालू सीजनमध्ये हा प्लेयर आतापर्यंत तीन सामने खेळलाय. पण तिन्ही मॅचमध्ये त्याला यश मिळालेलं नाही. या खेळाडूला बीसीसीआयच्या सिलेक्टर्सनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलसाठी टीम इंडियाच्या स्क्वाडमध्ये स्थान दिलय.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 ची फायनल मॅच भारत आणि ऑस्ट्रेलियात द ओव्हल ग्राऊंडवर जून महिन्यात होणार आहे. या मॅचसाठी 31 वर्षाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला टीम इंडियात स्थान दिलय.

कितीच्या इकॉनमीने धावा दिल्या?

आय़पीएल 2023 मध्ये जयदेव उनाडकट एक-एक विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करतोय, या सीजनमध्ये त्याने 3 मॅचेसमध्ये 11.50 च्या इकॉनमीने धावा दिल्या आहेत. जयदेव उनाडकटच्या या प्रदर्शनामुळे कुठे ना कुठे टीम इंडियाच टेन्शन वाढलय.

आयपीएलमध्ये त्याचा शानदार रेकॉर्ड

जयदेव उनाडकट आयपीएल करियरमध्ये आतापर्यंत 94 सामने खेळलाय. त्यात त्याने 91 विकेट घेतल्यात. जयदेव उनाडकटने आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक सुद्धा घेतलीय. आयपीएलमध्ये पाच विकेट घेण्याचा कारनामा त्याने दोनवेळा केलाय. आयपीएलमध्ये जयदेव उनाडकटशिवाय जेम्स फॉकनरने 2 वेळा 5 विकेट घेण्याचा कारनामा केलाय.

12 वर्षानंतर टीम इंडियात संधी

जयदेव उनाडकटला मागच्यावर्षी डिसेंबर महिन्याात बांग्लादेश दौऱ्याच्यावेळी भारतीय टेस्ट टीममध्ये जागा मिळाली होती. तो 12 वर्षानंतर भारतासाठी टेस्ट मॅच खेळला होता. बांग्लादेश विरुद्ध सीरीजच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये पहिल्या डावात उनाडकटने 50 धावा देऊन 2 विकेट काढल्या होत्या. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला एक विकेट मिळाला,

टीम इंडियाकडून कामगिरी कशी?

याआधी 2010 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सेंच्युरीयनमध्ये टीम इंडियासाठी टेस्ट मॅच खेळला होता. जयदेव उनाडकटने भारतासाठी 7 वनडे मॅचमध्ये 8 विकेट आणि 10 टी 20 इंटरनॅशनल मॅचमध्ये 14 विकेट घेतल्यात. 2 टेस्ट मॅचमध्ये त्याच्या नावावर 3 विकेट आहेत.