PAK vs AFG : शारजाहमध्ये पाकिस्तानची लाज गेली, अफगाणिस्तानने रचला इतिहास

| Updated on: Mar 27, 2023 | 9:18 AM

PAK vs AFG T20 : पहिल्या टी 20 सामन्यात सहा विकेटने विजय मिळवला होता. दुसऱ्या टी 20 सामन्यात पाकिस्तानला 7 विकेटने धूळ चारली. अफगाणिस्तानची टीम पाकिस्तान विरुद्ध नेहमी त्वेषाने खेळते हे पुन्हा एकदा दिसून आलं.

PAK vs AFG : शारजाहमध्ये पाकिस्तानची लाज गेली, अफगाणिस्तानने रचला इतिहास
pak vs afg
Follow us on

PAK vs AFG T20 : पाकिस्तान क्रिकेट टीमला रविवारी लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. शारजाहमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात पराभव झाला. या पराभवासह पाकिस्तानने सीरीजही गमावली. बाबर आजम, मोहम्मद रिजवान आणि शाहीन आफ्रिदीशिवाय पाकिस्तानची टीम खेळत होती. अफगाणिस्तानचे गोलंदाज त्यांच्यासाठी एक कोडं बनले. पहिली टी 20 त्यानंतर दुसऱ्या टी 20 मध्येही पाकिस्तानी फलंदाजांना अफगाणिस्तानच्या गोलंदाजीच उत्तर सापडलं नाही.

तीन टी 20 सामन्यांच्या सीरीजमध्ये अफगाणिस्तानने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानच्या टीमने टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये फक्त 130 धावा केल्या.

शारजाहमध्ये टीमचा ऐतिहासिक विजय

अफगाणिस्तानसाठी सुद्धा या आव्हानाचा पाठलाग करणं आव्हान बनलं होतं. पण मोहम्मद नबी पुन्हा एकदा संकटमोचक बनला. त्याने एक चेंडू बाकी राखून शारजाहमध्ये टीमला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानचा पाकिस्तान विरुद्ध हा पहिला मालिका विजय आहे.

पाकिस्तानची फ्लॉप बॅटिंग

पाकिस्तानने पहिल्या टी 20 मध्ये सुद्धा खराब फलंदाजी केली होती. रविवारी फजलहक फारुकीने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या टॉप ऑर्डरला हादरे दिले. पहिल्याच ओव्हरमध्ये साइम अयूब आणि शफीक यांना एकापाठोपाठ एक आऊट केलं. त्यावेळी पाकिस्तानच खातही उघडलं नव्हतं. मोहम्मद हॅरिससही 15 रन्स करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. इमाद वसीम आणि शादाब खानने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. इमादच्या 64 धावांच्या बळावर पाकिस्तानची टीम कशीबशी 130 धावांपर्यंत पोहोचली.

पाकिस्तानचे शेवटपर्यंत प्रयत्न

अफगाणिस्तान टीमसाठी धावांचा पाठलाग करण अजिबात सोपं नव्हतं. पाकिस्तानी गोलंदाजांनी शेवटपर्यंत आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. गुरबाजने चांगली सुरुवात केली. नसीम शाहला पहिल्याच ओव्हरमध्ये सिक्स मारला. त्यानंतर मात्र अफगाणिस्तानची लय बिघडली. मॅचमध्ये फक्त सिंगल रन्स येत होते. खेळाडूंना बाऊंड्रीची संधी मिळत नव्हती. अफगाणिस्तानची टीम खूपच दबावात होती. पण मोहम्मद नबी आणि जादरानच्या भागीदारीने टीमचा विजय सुनिश्चित केला.