पर्थ: पर्थच्या पीचवर पाकिस्तान आणि नेदरलँडसमध्ये महत्त्वाची मॅच सुरु आहे. हा सामना जिंकण दोन्ही टीम्ससाठी महत्त्वाच आहे. सलग दोन पराभवांमुळे पाकिस्तानी टीम टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात त्यांच्या टीमचा जिंकण्यासाठीचा आवेश दिसून येतोय. पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफचा वेग या टुर्नामेंटमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
हॅरिर रौफच्या वेगवान गोलंदाजीला आज पर्थच्या विकेटची साथ मिळाली. त्यानंतर त्याची बॉलिंग अधिक घातक बनली. नेदरलँड्सच्या लीड नावाच्या फलंदाजाला त्याची किंमत चुकवावी लागली.
कुठल्या ओव्हरमध्ये घडली घटना?
हॅरिस रौफच्या एका 142 किलोमीटर प्रतितास वेगवान चेंडूने नेदरलँड्सच्या फलंदाजाला घायाळ केलं. लीड असं या फलंदाजाच नाव आहे. हॅरिसचा चेंडू खेळताना त्याचं तोंड फुटलं. नेदरलँड्सच्या डावात सहाव्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. पाकिस्तानची टीम नव्या चेंडूने आक्रमक गोलंदाजी करत होती. पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात लीड घायाळ झाला.
142kph वेगाने टाकलेला चेंडू
नेदरलँड्सच्या डावात बाबर आजमने पावरप्लेच्या लास्ट ओव्हरमध्ये हॅरिस रौफला गोलंदाजी दिली. हॅरिसचा ओव्हरमधील 5 वा चेंडू खेळताना लीड जखमी झाला. 142 किमी प्रतितास वेगाने हॅरिसने चेंडू टाकला होता. लीडच्या चेहऱ्यावर डोळ्याच्या खाली कट पडला. सुदैवाने त्याचा डोळा बचावला. पण लीडला मैदानाबाहेर जाव लागलं.
No they can’t play him
That bouncer from haris#PAKvsNED pic.twitter.com/UD7VJnzfEy— Mahi?? (@Momminahh) October 30, 2022
रिटायर्ड हर्ट
लीड रिटायर्ड हर्ट झाला, त्यावेळी 6 धावांवर खेळत होता. आता तो पुन्हा फलंदाजीला मैदानात येणार की, नाही त्यावर स्पष्टता नाहीय. मार लागल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते.