लाहोर : भारतात सध्या IPL 2023 ची धूम आहे. त्याचवेळी शेजारच्या पाकिस्तानात वनडे सीरीज सुरु आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या वनडे सीरीजमध्ये धावांचा पाऊस पडतोय. 5 वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये पाकिस्तानी टीम 2-0 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना पाकिस्तानने 7 विकेटने जिंकला.
पाकिस्तानने दुसऱ्या वनडेत डोंगराएवढ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. यात रोहित शर्माची बरोबरी करणाऱ्या फखर जमांची भूमिका महत्वाची होती.
कठीण होतं, पण अशक्य नक्कीच नव्हतं
न्यूझीलंडने पहिली बॅटिंग केली. डॅरेल मिचेलच्या शतकाच्या बळावर 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 336 धावा केल्या. डॅरेल मिचेलने 119 चेंडूत 129 धावा चोपल्या. टीमचा कॅप्टन टॉम लॅथमने 98 धावा केल्या. पाकिस्तानसाठी 337 रन्सच टार्गेट कठीण होतं. पण अशक्य नक्कीच नव्हतं. मागच्याच वर्षी त्यांनी यापेक्षा मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता.
किती फोर, सिक्स मारले?
यशस्वी रेन चेससाठी ज्या सुरुवातीची अपेक्षा होती, फखर जमांने तशी सुरुवात दिली. फखर जमांने न्यूझीलंड विरुद्ध डावाची सुरुवात केली. त्याने 144 चेंडूंचा सामना करताना नाबाद 180 धावा केल्या. या दरम्यान त्याने 17 चौकार आणि 6 सिक्स मारले. वनडेमध्ये फखर जमांच हे सलग तिसरं शतक आहे. वनडे करियरमधील 10 वी सेंच्युरी आहे.
रोहितच्या कुठल्या रेकॉर्डची बरोबरी?
फखर जमांने वनडे क्रिकेटमध्ये वेगाने 3000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवलय. त्याशिवाय रोहित शर्माच्या एका रेकॉर्डची बरोबरी केली. रोहित सारखच वनडेमध्ये 180 किंवा त्यापेक्षा जास्त धावा 3 वेळा बनवणारा फलंदाज बनलाय.
WHAT A CHASE ?
Pakistan pull off their second-highest ODI run-chase on the back of @FakharZamanLive‘s remarkable 1️⃣8️⃣0️⃣ not out ?#PAKvNZ | #CricketMubarak pic.twitter.com/rh0Z2hQHxZ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 29, 2023
पाकने कुठल्या टीम विरुद्ध सर्वात मोठ्या लक्ष्याच पाठलाग केलाय?
रोहितच्या रेकॉर्डची बरोबरी करणाऱ्या फखर जमांने दुसऱ्या वनडेत 4 चेंडू आधी पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने 337 धावाचं टार्गेट 49.2ओव्हर्समध्ये गाठलं. वनडे क्रिकेटमधील पाकिस्तानच हे दुसरं मोठं रन चेस आहे. याआधी मागच्यावर्षी लाहोरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानने यापेक्षा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला होता.
न्यूझीलंडसाठी आता करो या मरो
5 वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये न्यूझीलंडसाठी आता पुढचा सामना करो या मरो असेल. पाकिस्तान वनडे सीरीज विनपासून फक्त एक पाऊल दूर आहे.