लाहोर: पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेल्या वेस्ट इंडिजच्या संघातील (west indies team) पाच जणांना कोरोना व्हायरसची (Corona virus) लागण झाली आहे. त्यांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे पाचही जण सध्या आयसोलेशन म्हणजेच विलगीकरणारमध्ये आहेत. या पाच जणांपैकी तीन खेळाडू आहेत. विकेट किपर फलंदाज शाही होप, स्पिनर अकिल हुसेल आणि ऑल राऊंडर जस्टीन ग्रेव्हीस या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झालीय, तर कोचिंग स्टाफमधील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत हे खेळाडू आता सहभागी होणार नाहीत. याआधी शेल्डन कॉट्रेल, रोस्टन चेस आणि काईल मेयर्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने टि्वट करुन या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती दिली. वेस्ट इंडिजचे प्रमुख खेळाडू कोरोना बाधित आहेत, त्यामुळे वेस्ट इंडिजच्या पाकिस्तान दौऱ्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
A further five members of the West Indies touring party have tested positive for COVID-19 | More below: https://t.co/lOhSH1UdIu
— Windies Cricket (@windiescricket) December 16, 2021
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजने पाकिस्तानपुढे आधीच शरणागती पत्करली आहे. पाकिस्तान टी-20 मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात 63 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात नऊ धावांनी विजय मिळवला. तिसरा सामना आज कराचीत होणार आहे.
संबंधित बातम्या:
दादाशी पंगा घेणारा विराट BCCI च्या फोटोंमधून गायब, हा इशारा का?
IND VS SA: विराटने बसमधून उतरुन सांगितलं, फोटो नका काढू, विमानतळावर नेमकं काय घडलं?
BWF World Championships 2021: कोर्टवर राज्य करत सिंधूचा दिमाखात उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश