Asia cup 2022: पाकिस्तानच घाणेरडं कृत्य, अर्शदीपच्या फोटोशी छेडछाड, तुमचही रक्त खवळेल

| Updated on: Sep 07, 2022 | 5:45 PM

Asia cup 2022: पाकिस्तान विरुद्ध मॅचमध्ये अर्शदीप सिंहच्या हातातून कॅच सुटली. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.

Asia cup 2022: पाकिस्तानच घाणेरडं कृत्य, अर्शदीपच्या फोटोशी छेडछाड, तुमचही रक्त खवळेल
Arshdeep singh
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: पाकिस्तान विरुद्ध मॅचमध्ये अर्शदीप सिंहच्या हातातून कॅच सुटली. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. आशिया कप 2022 स्पर्धेत रविवारी भारत-पाकिस्तानमध्ये सामना झाला. हातातून कॅच सुटली म्हणून अर्शदीपला काही ट्रोलर्सनी खलिस्तानी सुद्धा ठरवलं. त्याच्या WikiPedia पेजशी छेडछाड करण्यात आली.

पाकिस्तानी कंपनीकडून छेडछाड

या सगळ्या प्रकारात पाकिस्तानच नाव समोर आलं आहे. आता अर्शदीपच्या फोटोशी सुद्धा छेडछाड झालीय. हा फोटो पाहिल्यानंतर हिंदुस्तानी क्रिकेट चाहत्यांच रक्त खवळेल. एका पाकिस्तानी कंपनीने अर्शदीपच्या फोटोशी छेडछाड केलीय. ही कंपनी गाडी खरेदी-विक्रीच काम करते.

अर्शदीप सिंहच्या जर्सीशी छेडछाड

पाकिस्तानी कंपनीने सोशल मीडिया पेजवर अर्शदीपचा फोटो पोस्ट केलाय. त्यांनी अर्शदीपच्या निळ्या जर्सीला हिरव्या रंगामध्ये बदललय. आक्षेपार्ह मेसेज सुद्धा लिहिलाय. Pakwheels नावाच्या कंपनीने आपल्या फेसबुक अकाऊंटवर अर्शदीप सिंहचा फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये अर्शदीपला पाकिस्तानी खेळाडू म्हणून दाखवलय. त्याच्या जर्सीचा रंग हिरवा दाखवलाय.

मेसेजमध्ये काय लिहिलय?

“मुलगा चांगला खेळला. मॅच जिंकल्याच्या आनंदात अर्शदीपला पाक व्हील्सकडून कार इंस्पेक्शन बिलकुल मोफत” असा मेसेज लिहिला आहे. Pakwheels ने आपल्या सोशल मीडिया पेजवर अर्शदीपचा फोटो पोस्ट केलाय.

पाकिस्तान कधी सुधारणार?

आशिया कप सुपर 4 मध्ये अर्शदीपच्या हातून पाकिस्तानच्या आसिफ अलीचा झेल सुटला. पाकिस्तानने या सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर अर्शदीप विरोधात कारस्थान रचण्यात आलं. सोशल मीडियावरुन त्याच्याविरोधात अभियान चालवण्यात आलं. पाकिस्तानच्या ISPR एजन्सीचा या मध्ये हात आहे. अर्शदीप सिंहच्या या प्रकरणाची भारत सरकारच्या आयटी मंत्रालायने दखल घेतली.

आशिया कपमधून टीम इंडिया जवळपास बाहेर गेली आहे. सुपर 4 मध्ये आधी पाकिस्तानकडून त्यानंतर काल श्रीलंकेकडून पराभव झाला. टीम इंडियाची फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे.