T20 World Cup साठी आम्ही उत्सुक, युएईत विजय मिळवणं सोपं, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमचं मत

| Updated on: Aug 18, 2021 | 7:03 PM

कोरोनाच्या संकटामुळे भारतात होणारा टी-20 विश्वचषक आता युएईमध्ये होणार आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे.

T20 World Cup साठी आम्ही उत्सुक, युएईत विजय मिळवणं सोपं, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमचं मत
बाबर आजम
Follow us on

मुंबई : बहुप्रतिक्षित अशा आंतरराष्ट्रीय टी-20 (T20 World Cup) विश्वचषकाच्या तारखा आयसीसीने जाहीर केल्यानंतर आता प्रत्येक गटातील संघाचे सामने कधी कोणासोबत असणार हे देखील जाहीर केले आहे. यामध्ये ग्रुप 2 मधील भारत, पाकिस्तान संघातील (India vs Pakistan) सामन्याची तारीखही जाहीर करण्यात आल्याने आता संपूर्ण क्रिकेट जगत या सामन्याची वाट पाहत आहे. दोन्ही संघाचा स्पर्धेतील पहिलाच सामना एकमेंकाविरुद्ध असणार आहे. 24 ऑक्टोबर, 2021 रोजी दुबईच्या मैदानात खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार मात्र अतिशय आत्मविश्वासात दिसत असून स्पर्धेत पाकिस्तान चांगलीच कामगिरी करेल असं त्याचं मत आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) एका मुलाखतीत म्हणाला, ”आगामी टी20 विश्वचषकासाठी मी आणि माझा संघ खूप उत्सुक आहोत. पाकिस्तान संघाचं नेतृत्त्व करण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तसंच ही एक मोठी जबाबदारी देखील आहे.”

‘युएईत खेळणं घरी खेळल्यासारखं’

पाकिस्तानमध्ये दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेच्या संघावर 2009 झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला त्यांचे आंतरराष्ट्रीय सामने यूएईतच खेळावे लागले होते. त्यामुळे तेथील मैदानांत पाकिस्तानने बरेच क्रिकेट सामने खेळले आहेत. याबद्दल बोलताना बाबर म्हणाला, ”युएईमध्ये आम्ही खूप क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे या ठिकाणी विश्वचषकाचे सामने खेळणं हे घरच्या मैदानात खेळल्यासारखं आहे.”

भारत पाकिस्तान टी20 विश्वचषकात

भारताचा टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजयाचा रेकॉर्ड 5-0 आहे. भारताने पाकिस्तानला 5 वेळा पछाडलं आहे. सर्वात शेवटी म्हणजे 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला 6 विकेट्सने मात दिली होती. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 5 विकेटच्या बदल्यात 118 धावा केल्या ज्या भारताने केवळ 4 विकेट गमावर पूर्ण केल्या.

2 वर्षानंतर भारत, पाकिस्तान आमने-सामने

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

हे ही वाचा

ICC T20 World Cup मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने, कोणाचं पारडं जड?

T20 World Cup Ind vs Pak : टी 20 च्या मैदानात सर्वात मोठा सामना, भारत वि पाकिस्तान मॅचचं टाईम टेबल जाहीर

T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहीर, भारतासोबत गटात ‘हे’ संघ, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर

(Pakistan captain Babar Azam is exited to play t20 world cup says its like home condtion for us)