कराची : बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) जगभरातील क्रिकेटप्रेमी सज्ज झाले आहेत. पुढील महिन्यात या स्पर्धेचा थरार युएईत पाहायला मिळणार आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ आपआपली रणनीती तयार करत असून काही संघानी आपले अंतिम खेळाडूंची घोषणाही केली आहे. न्यूझीलंडनंतर आता पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket) त्यांच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
या संघामध्ये विशेष गोष्ट अशी आहेकी, 15 सदस्यांमध्ये केवळ 5 विश्वासू फलंदाजाना स्थान देण्यात आलं आहेय. त्यांच्याशिवाय 2 यष्टीरक्षक, 4 ऑलराउंड अष्टपैलू आणि 4 वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. तर 3 खेळाडू राखीव म्हणून संघासोबत असतील. हा संघ विश्वचषकाआधी न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) यांच्याविरुद्ध सामने खेळणार आहे. पाकिस्तान संघ लाहोर आणि रावळपिंडी या घरच्या मैदानात 7 टी-20 सामने खेळणार आहे. 25 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान हे सामने होतील.
ANNOUNCED – Our squad for the #T20WorldCup, #PAKvNZ and #PAKvENG pic.twitter.com/oVRIwzzmMZ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 6, 2021
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिल अली, आजम खान, हॅरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, खुशदिल शाह, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, शोएब मकसूद, शाहीन आफ्रीदी
राखीव खेळाडू : फखर जमान, उस्मान कादिर, शाहनवाज दहानी
Asif and Khushdil return for ICC Men’s T20 World Cup 2021
More details ➡️ https://t.co/vStLml8yKw#PAKvNZ | #PAKvENG | #T20WorldCup pic.twitter.com/9samGbJgDJ
— PCB Media (@TheRealPCBMedia) September 6, 2021
संबंधित बातम्या
(Pakistan Cricket announces 15 member team for ICC Mens T20 World Cup 2021)