मुंबई : 2021 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत होऊन पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुबईत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. स्पर्धेतील प्रवास संपल्यानंतर पाकिस्तानी संघाने आपला गाशा गुंडाळला आहे. संघाने नुकतेच दुबईहून उड्डाण केले. मात्र त्या फ्लाइटने पाकिस्तानची वाट धरली नाही. हे विमान कराची, इस्लामाबाद किंवा लाहोरला न पोहोचता ढाका येथे दाखल झालं आहे. बाबर आझम अँड कंपनी उपांत्य फेरीत झालेल्या पराभवामुळे घाबरुन ढाक्याला गेलेली नाही, तर बांगलादेशविरुद्ध क्रिकेट मालिका खेळण्यासाठी तेथे गेली आहे. पाकिस्तानचा बांगलादेश दौरा 19 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. (Pakistan cricket team arrive in Dhaka to play T20 and Test series against Bangladesh)
पाकिस्तान संघाने बांगलादेश दौऱ्यासाठी 18 सदस्यीय संघाची निवड केली आहे, ज्यामध्ये 17 जण तेच आहेत, जे 2021 च्या T20 विश्वचषकातील संघाचा भाग होते. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानी संघाने अप्रतिम कामगिरी केली. पाकिस्तान हा एकमेव असा संघ होता ज्याला ग्रुप स्टेजमध्ये पराभवाचा सामना करावा लागला नाही. अपराजित राहून या संघाने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले होते, मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाने त्यांच्या सर्व प्रयत्नांवर क्षणार्धात पाणी फेरले.
बांगलादेश दौऱ्यावर पाकिस्तान संघाला 3 टी-20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. पहिले 2 टी-20 सामने ढाका येथे 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. यानंतर तिसरा टी-20 सामनाही ढाका येथे होणार आहे, मात्र तो २२ नोव्हेंबरला खेळवला जाईल. टी-20 मालिकेनंतर 26 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना 26 ते 30 नोव्हेंबर दरम्यान चितगाव येथे तर दुसरा कसोटी सामना 4 ते 8 डिसेंबर दरम्यान ढाका येथे खेळवला जाईल.
Pakistan team departs from Dubai to Dhaka for three T20I and two Test match series against Bangladesh which begins on 19 November.#BANvPAK | #HarHaalMainCricket pic.twitter.com/0lJqAHFYie
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 12, 2021
पीसीबीने आपल्या ट्विटर हँडलवरून पाकिस्तानचा संघ बांगलादेशला रवाना झाल्याची माहिती दिली. विमानतळावरील खेळाडूंचे फोटो शेअर करत त्यांनी खेळाडूंच्या दुबईहून ढाका येथे रवाना झाल्याची माहिती दिली.
इतर बातम्या
उनाडकटला पुन्हा संधी नाहीच, नाराज जयदेवने VIDEO शेअर करत बीसीसीआयवर साधला निशाणा
(Pakistan cricket team arrive in Dhaka to play T20 and Test series against Bangladesh)