मुंबई : आगामी टी-20 विश्वचषकाकडे (ICC T20 World Cup) संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिले आहे. आयसीसीने (ICC) सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वीच भारतीय संघही जाहीर केला. दरम्यान या स्पर्धेत सर्वांत मोठं आकर्षण म्हटलं तर भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs pakistan) यांच्यात होणारा सामना हेच आहे. अगदी फायनलच्या सामन्यापेक्षा अधिक क्रेज या सामन्याचं आहे. पण या सामन्यापूर्वीच भारत आणि पाकिस्तान यांच्यात वेगळ्याच प्रकारचं शितयुद्ध सुरु झालं होतं. ज्यात अखेर भारताचाच विजय झाला आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आपआपसांतील संबधामुळे एकेमेकांचे दौरे करत नसल्याने केवळ विश्वचषक, आशिया कप, चॅम्पियन्स ट्रॉफी अशा मोठ्या स्पर्धांतच ते एकमेकांशी भिडतात. दरम्यान यंदाची विश्वचषक स्पर्धा ही कोरोनाच्या संकटामुळे भारताऐवजी युएईत होत आहे. पण यजमानपद भारताचच असल्याने सर्व संघाच्या जर्सीवर होस्ट म्हणून टीम इंडियाचच नाव आहे. पण असं असतानाही पाकिस्तानने त्यांची चिडकी वृत्ती न सोडत वर्ल्ड कपच्या जर्सीवर यजमान असणाऱ्या भारताच्या (India 2021) जागी सामने पार पडणार असलेल्या युएईचं (UAE 2021) नाव लिहिलं होतं. पण बीसीसीआयने (BCCI) यावर हरकत घेताच अखेर पाकिस्तानला माघार घेत नवी जर्सी छापून त्यावर टीम इंडियाचं नाव छापावं लागलं आहे. याआधी पाकिस्तानने जर्सीवर इंडियाच नाव छापलं नसताना अनेक नेटकऱ्यांनी याबाबत ट्विट केलं होते.
Pakistan ?? T20 World Cup Kit ? pic.twitter.com/AaTWIl63EI
— Thakur (@hassam_sajjad) October 6, 2021
आता मात्र पाकिस्तान संघाने नवी जर्सी छापत त्यावर सन्मानाने टीम इंडियाचं नाव लिहिलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या जर्सीचे फोटोही त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन ट्विट केले आहेत.
Pakistan’s @T20WorldCup jersey unveiled! ?? ?⭐
Get your official shirt now!
Order now at https://t.co/A91XbZsSbJ#WearYourPassion x #WhyNotMeriJaan pic.twitter.com/auQZgBllTE— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 15, 2021
टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.
हे ही वाचा
T20 World Cup 2021 मध्ये पाकिस्तानची पहिली लढत भारताशी, सामन्याच्या काही दिवस आधीच संघाला मोठा झटका
ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मॅक्सवेलची गर्लफ्रेंड भारतीय वंशाची, लवकरच लग्नबंधनात अडकणार, पाहा PHOTO
पंचांच्या निर्णयाआधीच पव्हेलियनकडे परतणारी पूनम राऊत म्हणते, ‘हा खेळ आहे, युद्ध नाही’
(Pakistan Cricket team finally printed indias name on World cup jersey as host)