सिडनी: पाकिस्तानी क्रिकेट टीम टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला भिडणार आहे. बुधवारी सिडनीमध्ये ही मॅच होईल. हा सामना रोमांचक होण्य़ाची अपेक्षा आहे. न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवणं, पाकिस्तानसाठी कठीण दिसतय. पाकिस्तानच्या चार कमतरता आहेत, ज्याचा फायदा किवी खेळाडू उचलू शकतात.
पहिली कमतरता काय?
पाकिस्तानची पहिली कमतरता आहे, त्यांची सलामीची जोडी. त्यांचे सलामीवीर सातत्याने अपयशी ठरतायत. भारताविरुद्ध या जोडीने फक्त एक रन्स केला होता. झिम्बाब्वे विरुद्ध बाबर-रिजवान जोडी 13 धावात संपुष्टात आली. नेदरलँड्स विरुद्ध या जोडीने फक्त 16 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या ओपनिग जोडीने 4 रन्स केल्या. बांग्लादेश विरुद्ध या जोडीने 57 रन्स केल्या. पण त्यासाठी ते 63 चेंडू खेळले.
त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही
पाकिस्तानची मिडल ऑर्डर त्यांची दुसरी कमजोरी आहे. इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, मोहम्मद हॅरिस कोणीचीही सरासरी 30 पर्यंत नाहीय. मिडल ऑर्डरने अभावानेच सातत्यपूर्ण प्रदर्शन केलय. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही.
शान मसूद चांगला खेळतोय, पण….
पाकिस्तानकडे एंकर फलंदाज नाहीय, ही त्यांची तिसरी कमतरता आहे. भारताकडे विराट कोहली आहे. पाकिस्तानकडे असा फलंदाज नाहीय. शान मसूदने चांगली कामगिरी केलीय. त्याची सरासरी 40 पेक्षा जास्त आहे. पण स्ट्राइक रेट 115 चा आहे.
फिल्डिंग कशी आहे?
पाकिस्तानची फिल्डिंग ही त्यांची सर्वात मोठी चौथी कमजोरी आहे. कोचिंगपासून ग्राऊंड फिल्डिंग पर्यंत पाकिस्तानची टीमची कामगिरी फार चांगली नाहीय. सेमीफायनलमध्ये त्यांनी कॅचेस सोडल्या, तर न्यूझीलंडची टीम त्यांना पुन्हा संधी देणार नाही.