पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीनंतर अखेर मोहम्मद रिझवानने तोंड उघडलं, स्पष्टच सांगितलं की.

| Updated on: Jul 02, 2024 | 7:24 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. त्यामुळे पाकिस्तान संघावर क्रीडाप्रेमींचा राग दिसत आहे. खेळाडू जिथे दिसतील तिथे डिवचण्याचा एकही संधी क्रीडाप्रेमी सोडत नाहीत. आता मोहम्मद रिझवानने पाकिस्तानी मीडियाशी बोलताना घरचा आहेर दिला आहे.

पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीनंतर अखेर मोहम्मद रिझवानने तोंड उघडलं, स्पष्टच सांगितलं की.
Follow us on

टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरल्यानंतर पाकिस्तानमध्ये चलबिचल सुरु आहे. क्रीडाप्रेमींनी पाकिस्तान संघावर टीकेचे बाण सोडले आहेत. पाकिस्तान संघाला या स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. अमेरिकेसारख्या दुबळ्या संघाने पराभवाचं पाणी पाजलं आणि सुपर 8 फेरीचं स्वप्न भंगलं. पाकिस्तानच्या या निराशाजनक कामगिरीनंतर सर्वच स्तरातून टीका होत आहे. आता पाकिस्तानचा विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद रिझवानने पेशावरमध्ये एक मोठं विधान केलं आहे. मोहम्मद रिझवान म्हणाला की, “पाकिस्तान संघावर जी टीका होत आहे ती अगदी बरोबर आहे. पाकिस्तान संघाने चांगली कामगिरी केली नाही म्हणूनच टीका होत आहे. लोकांनी केलेली टीका सहन करता आली नाही तर यशही मिळवू शकत नाही.” यावेळी मोहम्मद रिझवानला संघावरील ऑपरेशनबाबत विचारलं गेलं. तेव्हा रिझवानने सांगितलं की, “ऑपरेशन एक साधी बाब आहे. जेव्हा कधी एखादी व्यक्ती आजारी पडते. तेव्हा ऑपरेशनची गरज असते. पीसीबी अध्यक्ष एक मेहनती व्यक्ती आहेत. कोण टीममध्ये राहणार आणि कोण नाही हा त्यांचा अधिक आहे.”

मोहम्मद रिझवानच्या या वक्तव्यामुळे क्रीडाप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. येत्या काही दिवसात पाकिस्तान संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. रिझवानने मान्य केलं की, पाकिस्तानी संघ आजारी आहे आणि यासाठी ऑपरेशनची गरज आहे. रिझवानने सांगितलं की, ‘टी20 वर्ल्डकपमध्ये टीमच्या पराभवाची अनेक कारणं आहेत. बॉलिंग आणि बॅटिंगला दोष देणं योग्य ठरणार नाही.’ या स्पर्धेत मोहम्मद रिझवानही फेल ठरला आहे. त्याला फक्त 110 धावा करता आल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट फक्त 90.9 टक्के होता. त्यामुळे मोहम्मद रिझवानवर तडी पडते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानात होत आहे. यासाठी आता फक्त 7 महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे बाबर आझमकडेच पाकिस्तानी संघाची धुरा असेल, असं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, बाबर आझमला परत कर्णधारपद देण्यात काही खेळाडूंचा विरोध आहे. त्यामुळे अशा स्थितीत पाकिस्तानचा संघ पुन्हा बांधणं कठीण आहे.