धक्कादायक! वयाच्या 36 व्या वर्षी प्रसिद्ध क्रिकेटपटूचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

| Updated on: Sep 30, 2022 | 3:59 PM

इतक्या लहान वयात मृत्यू झाल्याने सर्वच जण हळहळले

धक्कादायक! वयाच्या 36 व्या वर्षी प्रसिद्ध क्रिकेटपटूचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू
shahzad azam rana
Image Credit source: Facebook
Follow us on

मुंबई: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शहजाद आजम राणाच वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी मृत्यू झाला. ह्दयविकारच्या झटक्याने शहजाद आजम राणाचं निधन झालं. इतक्या कमी वयात ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने कुटुंबीय, मित्र परिवार सर्वांनाच धक्का बसला आहे. शहजाद आजम राणा सियालकोटचा राहणारा आहे. तो डावखुरा वेगवान गोलंदाज होता.

किती विकेट घेतल्या?
शहजाद पाकिस्तानात 95 फर्स्ट क्लास सामने खेळलाय. त्याशिवाय 58 लिस्ट ए आणि 29 टी 20 च्या मॅचेस सुद्धा खेळल्या आहेत. शहजाद आजम राणाने आपल्या प्रोफेशनल करियरमध्ये 496 विकेट घेतल्या आहेत.

फर्स्ट क्लासमध्ये त्याच्या नावावर 388 विकेट आहेत. लिस्ट ए मध्य् त्याने 81 आणि टी 20 क्रिकेटमध्ये 27 विकेट घेतल्यात. शहजाद बाबर आजमसोबतही क्रिकेट खेळला होता.

शेवटच्या मॅचमध्ये किती विकेट काढल्या?

शहजाद आजम आपला शेवटचा फर्स्ट क्लास सामना आणि लिस्ट ए मॅच 2018 मध्ये खेळला होता. शेवटच्या लिस्ट ए मॅचमध्ये आजमने 5 विकेट काढल्या होत्या. शेवटचा टी 20 सामना हा खेळाडू 2020 मध्ये खेळला होता.

इस्लामाबादसाठी खेळणाऱ्या शहजाद 2017-18 साली चर्चेत आला होता. या वेगवान गोलंदाजाने इस्लामाबादसाठी 7 मॅचमध्ये 26 विकेट घेतल्या. त्यानंतर 2018-19 वनडे कपमध्ये इस्लामाबादसाठी सर्वात जास्त विकेट घेतल्या.