VIDEO: अरे, हे काय? T20 मॅचमध्ये बाऊंड्री लाइनवर पाकिस्तानी अँकर धाडकन कशी पडली?

| Updated on: Jan 19, 2023 | 11:53 AM

क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला काहीवेळा अजब-गजब घटना पहायला मिळतात. काही फोटो, व्हिडिओ तुम्हाला पोट धरुन हसायला भाग पाडतात. आता आम्ही तुम्हाला ज्या घटनेबद्दल सांगणार आहोत, अशा घटना क्वचित घडतात.

VIDEO: अरे, हे काय? T20 मॅचमध्ये बाऊंड्री लाइनवर पाकिस्तानी अँकर धाडकन कशी पडली?
pakistan female sports anchor zainab abbas
Image Credit source: instagram
Follow us on

डरबन: क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला काहीवेळा अजब-गजब घटना पहायला मिळतात. काही फोटो, व्हिडिओ तुम्हाला पोट धरुन हसायला भाग पाडतात. आता आम्ही तुम्हाला ज्या घटनेबद्दल सांगणार आहोत, अशा घटना क्वचित घडतात. क्रिकेटर्स बाऊंड्री लाइनवर फिल्डिंग करताना काहीवेळा ते चाहत्यांना स्वाक्षरी देतात. अभिवादन करतात. पण ही गोष्ट थोडी वेगळी आहे. यात खेळाडू, फॅन्स नाहीत, तर होस्ट करणारी एक पाकिस्तानी अँकर आहे. पाकिस्तानी अँकर जैनब अब्बासचा हा विषय आहे. अनेक आयसीसी इव्हेंटस जैनब अब्बासने होस्ट केले आहेत.

कोण आहे जैनब अब्बास?

हे सुद्धा वाचा

जैनब अब्बासचा स्पोर्ट्स वर्ल्डमधला हा एक मोठा चेहरा आहे. अनेक आयसीसी इव्हेंटस जैनब अब्बासने होस्ट केले आहेत. पाकिस्तानी सुपर लीगमध्ये जैनब अब्बासची अँकरिंग पहायला मिळते. सध्या ती दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेली SA20 T20 लीग होस्ट करतेय. या टुर्नामेंटमध्ये 18 जानेवारीला असं काही घडलं की, जैनब अब्बास पुन्हा अशी सिचुएशन टाळण्याचा प्रयत्न करेल.


अचानक एक घटना घडली

SA20 लीगमध्ये मुंबई इंडियन्स केपटाऊन आणि सनरायजर्स ईस्टर्न कॅपमध्ये सामना सुरु होता. सनरायजर्सची इनिंग सुरु होती. मुंबईने सनरायजर्सला 172 धावांच टार्गेट दिलं होतं. त्याचवेळी बाऊंड्री लाइनवर जैनब अब्बासचा एक इंटरव्यू सुरु होता. याच दरम्यान अचानक एक घटना घडली.

व्हिडिओ व्हायरल

13 व्या ओव्हरच्या लास्ट बॉलवर सनरायजर्सचा बॅट्समन मार्को जॅनसेन स्ट्राइकवर होता. सॅम करन गोलंदाजी करत होता. करनच्या या चेंडूवर जॅनसेनने शॉट मारला. चेंडू सरळ सीमारेषेवर गेला. चेंडू बाऊंड्री लाइनपार जाऊ नये, यासाठी फिल्डरने प्रयत्न केला. त्याचवेळी घडू नये, अशी घटना घडली. बाऊंड्री लाइनवर फिल्डर पाकिस्तानी अँकरला धडकला. ती धाडकन खाली पडली. क्रिकेटच्या मैदानात फार क्वचित अशा घटना घडतात. सुदैवाने जैनब अब्बासला मोठा मार लागला नाही. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.