लाहोर: पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सईद अनवरने दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हाशिम अमलाबद्दल धक्कादायक खुलासा केलाय. हाशिम अमलाने हिंदुंना मुस्लिम बनवलं, असा सईद अनवरने दावा केलाय. सईद अनवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सईन अनवरने पाकिस्तानकडून 55 टेस्ट मॅचमध्ये 4 हजार 52 धावा आणि वनडेत 247 सामन्यात 8 हजार 824 धावा केल्या आहेत. कुठल्यातरी इवेंटमधला हा व्हिडिओ आहे. सईद अनवर या व्हिडिओमध्ये हाशिम अमलाच कौतुक करताना दिसतो. सईद अनवरने अमलाबद्दल जी विधान केलीयत, त्यावरुन वाद निर्माण झालाय.
अनेक लोकांना कलमा शिकवलय
“वर्ल्ड कपमध्ये अनेक लोक इस्लाम कबूल करतायत. अल्लाहने वर्ल्ड कपला एक माध्यम बनवलय. हाशिम अमला जबरदस्त क्रिकेटर आहे. त्याने अनेक लोकांना कलमा शिकवलय. एक संपूर्ण हिंदू कुटुंबाला मुस्लिम बनवलं. मोहम्मद युसूफ सुद्धा अनेकांसाठी माध्यम बनला” असं सईद अनवर या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतोय.
India invites Hashim Amla to make money in IPL. Amla returns favour by converting Hindus to Islam.
Reveals Pak captain Saeed Anwar
Check our thread on #CricketJihad in next tweet pic.twitter.com/C5jVAiSyGO
— Pakistan Untold (@pakistan_untold) January 12, 2023
हाशिम अमला भारताशी संबंधित
सईद अनवर त्याच्या या विधानासाठी मोठ्या प्रमाणात ट्रोल होतोय. हाशिम अमलाच मूळ भारताशी संबंधित आहे. 1927 साली अमलाचे आजोबा दक्षिण आफ्रिकेला निघून गेले. अमला 2004 ते 2019 दरम्यान 124 टेस्ट, 181 वनडे आणि 44 टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच प्रतिनिधीत्व केलं. त्याच्या नावावर 9 हजार 282 टेस्ट रन्स, 8113 वनडे रन्स आणि 1277 टी 20 रन्स आहेत. वनडे क्रिकेटमध्ये अमलाच्या नावावर वेगाने 2 हजार, 3 हजार, 4 हजार, 5 हजार, 6 हजार आणि 7 हजार धावा बनवण्याचा रेकॉर्ड आहे. सर्वाधिक वेगवान 10 वनडे शतकही त्याने झळकवली आहेत. त्याने जून 2014 ते जानेवारी 2016 दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट टीमच नेतृत्व केलं.
हाशिम अमला आयपीएलमध्ये सुद्धा खेळलाय. 2017 साली किंग्ज इलेव्हन पंजाबकडून त्याने दोन शतकं झळकावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्षमता दाखवल्यानंतर 8 ऑगस्ट 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या या क्रिकेटरने सन्यास घेतला.